Type to search

निळवंडे धरणाच्या कालव्याची कामे बंद असल्यामुळे बिनकालव्याचे धरण व पाण्याअभावी लाभधारकांचे मरण

Featured सार्वमत

निळवंडे धरणाच्या कालव्याची कामे बंद असल्यामुळे बिनकालव्याचे धरण व पाण्याअभावी लाभधारकांचे मरण

Share
पिंपरी निर्मळ (वार्ताहर) – उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती टापूला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे अकोले तालुक्यात बंद आहेत. उच्च न्यायालयाने बंद कामे सुरू करण्याचे आदेश देऊनही याबाबत लाभक्षेत्रातील सर्वच पुढारी चिडीचूप आहेत. पाटबंधारे विभागाकडूनह ीअकोलेतील कालव्यांची कामे सुरू करण्यासाठी हालचाल होताना दिसत नसल्यामुळे धरणात पाणी असूनही बिनकालव्याचे धरण अन पाण्याअभावी लाभधारंकांचे दुष्काळाने मरण, अशी अवस्था झाली आहे. पुढील महिन्यापासून पावसाळा सुरू होत असल्याने अकोलेतील कालव्यांच्या कामांचे भवितव्य काय, असा सवाल लाभधारंकामधून विचारला जात आहे.

राहाता, कोपरगाव, राहुरी, संगमनेर, अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील 68 हजार हेक्टर जिरायती व दुष्काळी भागासाठी निळवंडेची निर्मिती करण्यात आली. धरणाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यामध्ये दरवर्षी पाणीही साठविले जात आहे. गेल्या दोन वर्षात कालव्यांच्या कामासाठी साडेतीनशे कोटीचा निधीही उपलब्ध झाला आहे. मात्र अकोले तालुक्यात धरणाच्या मुखाजवळ 0 ते 28 कि.मी. अंतरातील कालव्यांची कामे स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकर्‍यांनी बंद पाडली आहेत. पन्नास वर्षापासून रखडलेल्या या प्रकल्पामुळे लाभक्षेत्राला प्रचंड दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. अकोलेतील कालव्यांची बंद कामे सुरू करण्यासाठी लाभक्षेत्रात शेतकर्‍यांचे अनेक आंदोलने, मोर्चे झाले.

औरगाबाद उच्च न्यायालयानेही कामे सुरू करण्याचे आदेश जलसंपदाला दिले. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व बंदोबस्ताच्या कारणाने कामे सुरू झाली नाहीत. मात्र सध्या मे महिना अर्धा संपत आला असून उन्हाळा अवघे पंधरा दिवस बाकी आहे. पुढील महिन्यात पावसाळा सुरु होत असून अकोले तालुक्यात प्रचंड पाऊस असतो. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिने अकोलेतील कालव्यांची कामे बंदच ठेवावी लागणार आहे. कालव्यांसाठी भूसंपादित जमिनीवर शेतकरी शेती करतात. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा या क्षेत्रावर पेरणी केली जाणार आहे. तसेच पावसाळ्यानंतर लगेच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार असून पुन्हा प्रशासनापुढे आचारसंहिता व बंदोबस्ताचे काम सुरु होईल.

मात्र कालव्यांची कामे रखडल्याने लाभक्षेत्रातील दुष्काळी शेतकर्‍यांचे मरण होणार आहे. विशेष बाब म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत निळवंडे प्रश्नावर खरपूस चर्चा झाली. मात्र निवडणुकीनंतर सर्वच नेते बंद कामाबाबत चकार शब्दही बोलताना दिसत नाही. तर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही जलसंपदांचे अधिकारी काम सुरु करण्यासाठी कागदी सोपस्कराशिवाय कोणत्याही हालचाली करताना दिसत नाही.

लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे उमेदवार खा. लोंखडे यांच्या प्रचार सभेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, केंद्रीय जंलसपंदा मंत्री नितीन गडकरी राहात्याला आले होते. निळवंडेवर त्यांनी भाषणेही ठोकली. आता निवडणूक संपली असून अकोलेतील बंद पडलेली कालव्यांची कामे सुरू करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री का देत नाहीत? असा सवाल लाभधारंकामधून विचारला जात आहे. त्याचबरोबर अकोलेतील काम बंद पाडणारे आ. पिचड व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात एकत्र आ. भाऊसाहेब कांबळेचा प्रचार करीत होते. नेते निवडणुकीसाठी एकत्र येतात तर बंद कामे सुरु करण्यासाठी का येत नाहीत असा प्रश्न लाभधारंकाना पडला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!