Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

खुशखबर! निळवंडे कालव्यांची कामे सुरू होणार

Share
 • प्रकल्प अहवालातील शर्थी अटी कायम राहणार
 • भंडारदरा व निळवंडे धरणाचे 6 टक्के पाणी बुडीत क्षेत्रासाठी राखीव ठेवणार
 • प्रवरा नदीवरील प्रस्तावित प्रोफाईल वॉलला निधी देणार
 • म्हाळादेवी उड्डाणपूल वर्षात पूर्ण करणार
 • बिताका प्रकल्पाला गती देणार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय

अकोले (प्रतिनिधी)-निळवंडे धरणाचे अकोले तालुक्यातील मुख्य कालवे पारंपरिक पध्दतीनेच पोलीस बंदोबस्ता विना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबईच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच अकोले तालुक्यातील विविध मागण्यांपैकी बहुतांश मागण्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या. प्रकल्प अहवालात असलेल्या अटी आणि शर्थीमध्ये कोणताही बदल न करता ही कामे पूर्ण करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे गेले अनेक दिवस निळवंडे कालवेप्रश्नी जिल्ह्यात सुरू असलेला संघर्ष निवळण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुबंई येथे काल मंगळवारी बैठक पार पडली. माजी मंत्री मधुकरराव पिचड व आ. वैभवराव पिचड यांनी अकोले तालुक्यातील विविध मागण्या मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडल्या. त्यातील बहुतांश मागण्यांना या बैठकीत हिरवा कंदील दर्शविण्यात आला. या बैठकीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री मधुकरराव पिचड, ज्येष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे व खा.डॉ. सुजय विखे, आ.शिवाजी कर्डिले, आ.मोनिका राजळे यांच्यासह जलसंपदा विभागाचे सचिव संजय चहल, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस प्रमुख इशू सिंधू, यांच्यासह जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे, तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, सरचिटणीस यशवंतराव आभाळे, अगस्ती कारखान्याचे संचालक अशोकराव आरोटे, अशोकराव देशमुख, राजेंद्र डावरे, बाजार समितीचे सभापती परबत नाईकवाडी, भाकपचे नेते कॉ. शांताराम वाळुंज, अमृतसागरचे संचालक गोरक्ष मालुंजकर, युवक तालुकाध्यक्ष शंभू नेहे, राहुल देशमुख, विठ्ठलराव आभाळे, आनंदराव वाकचौरे, खंडू वाकचौरे, शंकरराव वाळुंज, रावसाहेब दौंड, बाळासाहेब घोडके, भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, शिवाजीराव धुमाळ, जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे, सदस्य जालिंदर वाकचौरे, सदस्या सुनीता भांगरे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, धनंजय संत, शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, बाजीराव दराडे, माधवराव तिटमे,विनोद हांडे, विकास वाकचौरे, भाऊसाहेब आभाळे, श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, अशोकराव थोरे, निळवंडे पाटपाणी कृती समितीचे ज्ञानेश्वर वर्पे, सुखलाल गांगवे, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, ऊर्ध्व प्रवरा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे, संगीता जगताप,जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, जी. बी.नानोर आदी अधिकार्‍यांसह अकोले तालुक्यातील कालवेग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड व आ.वैभवराव पिचड यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. यावेळी पिचड पिता पुत्रांनी अकोले तालुक्यातील कालवेग्रस्त शेतकर्‍यांच्या बंदिस्त कालव्यांसंदर्भात भूमिका मांडत तालुक्यातील अन्य मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.  यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मी चुकीचे काम करणार नाही, बंदिस्त कालव्यांसाठी 1600 कोटी तर पारंपरिक कालव्यांना 250 कोटी खर्च अपेक्षित आहे. ही बाब किती व्यवहार्य आहे हे सांगा, निळवंडेची कालवे प्रचलित पद्धतीने सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असून सरकारवर न्यायालयाचा अवमान केला म्हणून कारवाई होऊ शकते, याबाबत सरकारला विचारणा होईल. तेव्हा अकोले तालुक्याच्या सर्व मागण्या मान्य केल्या. आता सरकारची कालवे सुरू करण्याची मागणी मान्य करा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला केली.पारंपरिक कालव्यांसाठी अकोले तालुक्यात संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी कालव्यांना जेवढी लागते तेवढीच घेऊन उर्वरित जमीन शेतकर्‍यांना कसण्यासाठी करारावर देण्याचा विचार करू असे सांगत विना पोलीस बंदोबस्तात कालव्यांची कामे सुरू करा असा आदेश देत अकोले तालुक्यातील प्रश्नांसंदर्भात लक्ष घालू अशी ग्वाही दिली.

याशिवाय उच्चस्तरीय कालव्यांना पाणी देण्यासाठी भंडारदरा व निळवंडे धरणाचे संयुक्त व्यवस्थापन करणार, अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरणाचे 6 टक्के पाणी बुडीत क्षेत्रासाठी राखीव ठेवणार, उच्चस्तरीय कालव्यांना पाणी देण्यासाठी लेव्हल मेंटेन ठेवणार,प्रवरेच्या बारमाही क्षेत्राचे पाणी आहे त्या त्या क्षेत्रातील शेतकर्‍याच्या संमतीने ज्याला जसे आवश्यक तसे देणार, प्रवरा नदीपात्रातील प्रस्तावित प्रोफाइल वॉलला केंद्रीय जलआयोगाची परवानगी असताना त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार,म्हाळादेवी येथील जलसेतूचे काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करणार, पिंपरकणेचा उड्डाणपूल 2020 पर्यंत पूर्ण करणार,उच्चस्तरीय कालव्यांतून 20 मार्च पर्यंत पाणी मिळणार,पिंपळगाव खांड धरणाचे लाभक्षेत्र हे आभाळवाडी (ता.संगमनेर)पर्यंतच असल्याने त्याव्यतिरिक्त पाणी सोडू नये, बिताका प्रकल्पाला गती देणार, कालव्यांसाठी ज्या जमिनी संपादित केल्या त्या कमी जमिनीच्या वापरात करणार,माळेगाव व केळुंगण उपसा सिंचन योजनांच्या निविदा काढणार, बंद पडलेल्या शासनाच्या उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पाणी वापर संस्था सुरू करून त्यांचे प्रतिज्ञापत्र घेऊन त्या दुरुस्त करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला,निळवंडे धरणग्रस्तांच्या शासकीय जमिनी त्वरित नावावर करण्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकार्‍यांना आदेश दिला.

 • खासदार लोखंडे यांनी आपली भूमिका विशद करताना विखे पाटील यांचा उल्लेख विरोधी पक्षनेते असा करताच मुख्यमंत्र्यांनी आता त्यांना आपल्या रांगेमध्ये बसविल्याचे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
 • तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी निळवंडे जलविद्युत प्रकल्पासाठी निंब्रळ येथील 35 प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची जी खातेफोड केली, तीच कायद्याला धरून नसल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांवरच कारवाई करण्यात यावी असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
 • खा. सुजय विखे पाटील यांच्या शेजारी बसलेले भाजपचे नेते अशोक भांगरे यांना उद्देशून खा. विखे म्हणाले की, आम्ही आतापर्यंत पूर्ण जाम झालो, आम्हाला (खालच्या भागाला) आता तरी पाणी मिळू द्या अशी हात जोडून विनंती केली.
 • 1989 च्या लवादाने भंडारदरा व निळवंडेचे पाणी वाटप केले आहे. त्यामुळे भंडारदरा व निळवंडेचे फेरपाणी वाटप होणार नसल्याचे राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट करत फेरपाणी वाटपाचा मुद्दा खोडून काढला. कालव्यांची कामे तात्काळ सुरू करण्यासाठी प्रशासनाने लवकरच पावले उचलवीत असेही यावेळी त्यांनी सांगितले.
 • राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात व पिचड हे ज्या प्रमाणे जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँकेत एकत्र येतात. त्याप्रमाणे त्यांनी कालव्यांच्या कामात एकत्र आले पाहिजे असे मत खासदार सदाशिव लोखंडे यांनी नोंदविले. अन्यथा लाभक्षेत्रात चुकीचा संदेश जाईल. 182 गावांना पाण्यापासून किती दिवस वंचित ठेवणार असून त्यांना तात्काळ पाणी दिले पाहिजे. तरुणांना युतीच्या सरकारकडून अपेक्षा आहेत, त्यांचा भ्रमनिरास झाला नाही पाहिजे असेही मत खा.लोखंडे यांनी मांडले.
 • खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत करून लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कालव्यांची कामे सुरू करण्याचे आपण दिलेले आश्वासन पूर्णत्वास जात आहे. जिरायती भागातील शेतकर्‍यांसाठी पाण्याची लढाई शेवटपर्यंत करतानाच पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे वळविण्याच्या निर्णयाचा पाठपुरावा करतानाच कुकडीच्या पाण्याची लढाईही आता यशस्वी करायची असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!