Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

खुशखबर! निळवंडे कालव्यांची कामे सुरू होणार

Share

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय, पिचड यांचीही संमती

अकोले (प्रतिनिधी)-निळवंडे धरणाचे अकोले तालुक्यातील मुख्य कालवे पारंपरिक पध्दतीनेच पोलीस बंदोबस्ता विना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबईच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच अकोले तालुक्यातील विविध मागण्यांपैकी बहुतांश मागण्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या. त्यामुळे गेले अनेक दिवस निळवंडे कालवेप्रश्नी जिल्ह्यात सुरू असलेला संघर्ष निवळण्यास मदत होणार आहे.

या बैठकीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, उद्योग मंत्रीसुभाष देसाई, माजी मंत्री मधुकरराव पिचड, ज्येष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील, आ.वैभवराव पिचड, खासदार सदाशिव लोखंडे व खा.डॉ सुजय विखे, आ.शिवाजी कर्डिले, आ.मोनिका राजळे यांच्यासह जलसंपदा विभागाचे सचिव संजय चहल यांच्यासह अनेक नेते व जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!