Type to search

Featured सार्वमत

निळवंडे कालव्यांचा निधी तापी खोर्‍यात वळविण्याचा आदेश

Share

दुष्काळी गावात संताप,निळवंडे कालवा कृती समितीचा आंदोलनाचा इशारा

कोपरगाव (प्रतिनिधी)- निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांना उच्च न्यायालयामार्फत 2232 कोटी रुपयांचा निधी मिळविण्यात कालवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले. मात्र या प्रकल्पाचे अकोले तालुक्यात कामबंद ठेवण्याचे काम प्रस्थापितांनी केले. दुसरीकडे या प्रकल्पाचा अखर्चित निधी तापी खोरे महामंडळात वर्ग करण्याचे षडयंत्र आखले गेले असून तो निधी वर्ग करण्याचे आदेश 7 मार्च रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाल्याने निळवंडे कालवा कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निळवंडे प्रकल्पाला निधी देण्याचे इतिवृत्त28 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारचे वकील असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे यांनी उच्च न्यायालयात सादर केले. राज्याच्या जलसंपदा विभागाकडे गत दहा महिन्यांपासून सुमारे 258 कोटींचा निधी शिल्लक असताना जलसंपदा विभाग अकोले तालुक्यात 0 ते 28 कि.मी.चे काम चालू करण्यास चालढकल करीत आहे. या निधीतून केवळ अकोले तालुक्यातील शून्य ते 28 कि.मी.तील खडकाळ भागातील कामे तातडीने करावीत अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीने जलसंपदा विभागाकडे वारंवार केली आहे. याबाबत उच्च न्यायालयाचे न्या.एस.एस.शिंदे,न्या.आर. जी.अवचट यांनी या कामाबाबत उशीर का होत आहे. कोण अडथळा आणत आहे याबाबत वस्तुस्थितीचे प्रतिज्ञापत्र 7 मार्च रोजी सादर करण्याचे आदेश दिले होते.

किंवा जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः तारखेस हजर राहण्याचे आदेश दिले होते. 7 मार्चला सुनावणी झाली असता राज्य सरकारचे वकील अमरजितसिंग गिरासे यांनी अकोलेतील कामाच्या प्रगतीबाबत अहवाल अद्याप प्राप्त झाला नसून त्यासाठी आणखी सहा दिवसांची मुदत वाढवून मागितली. दुसरीकडे हा प्रकल्प होऊच नये यासाठी उत्तर नगर जिल्ह्यातील पुढारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना हाताशी धरून अकोलेतील कामबंद ठेवण्याचे काम करत आहे. तर हा निधी अखर्चित दाखवून तो निधी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे वर्ग करण्याचे षडयंत्र आखले असून त्यावर कार्यवाही करण्यास प्रारंभ केल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. जलसंपदा विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाने नगर जलसंपदा, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक नगर यांना प्रकल्पावर खर्च न झालेला निधी कार्यकारी संचालक तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांच्याकडे वळती करणे संदर्भात कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ औरंगाबाद यांचे निर्देश आहे.

नगर जिल्ह्यातील जलसंपदाचा आपल्या मंडलातील प्रकल्पावर खर्च न झालेला निधी कार्यकारी संचालक तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांचेकडे वळती करण्याबाबत कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांचे निर्देश आहेत. या घटनेने उत्तर नगर जिल्ह्यातील निळवंडे कालवा कृती समितीसह 182 गावांतील शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून हा निर्णय ताबडतोब थांबविला नाही तर जलसंपदा विभागाच्या विरुद्ध मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा निळवंडे कालवा कृती समितीचे नानासाहेब जवरे, अध्यक्ष रुपेंद्र काले, नानासाहेब गाढवे, विठ्ठलराव पोकळे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, गंगाधर रहाणे, नामदेवराव दिघे, रमेश दिघे, मच्छिंद्र दिघे, पाटीलबा दिघे, सोमनाथ दरंदलेे, अशोकराव गांडुळे, विठ्ठल गांडुळे, संतोष तारगेे, शरद गोर्डे, साहेबराव आदमाने, जालिंदर लांडे, सचिन मोमले, अतुल मोमले, दत्तात्रय थोरात, बाबासाहेब गव्हाणे, भाऊसाहेब गव्हाणे, उत्तम थोरात, दत्तात्रय आहेर, सोपानराव जोंधळे, उत्तमराव जोंधळे, दिलीप खालकर, रामनाथ पाडेकर, मच्छींद्र रहाणे, गोपीनाथ खकाळे, शंकरराव रहाणे, पोपट रहाणे, दादा जाधव, भाऊसाहेब गोर्डे, चंद्रभान गोर्डे, अण्णासाहेब काळे, अशोक गाढे, दत्तात्रय येलम, सुरेश माताडे, वाल्मिक गाढे, शशिकांत साब्दे, भाऊसाहेब साब्दे, अमोल साब्दे आदींनी दिला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!