Type to search

‘निळवंडे’चा पाठपुरावा थांबविण्यासाठी जीवे मारण्याची धमकी

Featured सार्वमत

‘निळवंडे’चा पाठपुरावा थांबविण्यासाठी जीवे मारण्याची धमकी

Share

कोपरगाव (प्रतिनिधी) – प्रलंबित असलेल्या निळवंडे कालव्यांचा पाठपुरावा 10 लाख रुपये घेऊन बंद करावा अन्यथा शहीद होण्याची तयारी ठेवावी, अशा आशयाची जीवे मारण्याची धमकी अज्ञात इसमाने निळवंडे कालवा कृती समितीचे नानासाहेब जवरे यांना दिली आहे. याबाबत कोपरगाव पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक जवरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विधिज्ञ अजित काळे यांच्यामार्फत सप्टेंबर 2016 मध्ये जनहित याचिका दाखल केली.

औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होऊन न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांना अकोलेतील बंद कालव्यांचे काम चालू करण्याचे आदेश 3 मे रोजी दिले आहेत. सदरचे काम सुरु करण्याचा हालचाली जिल्हास्तरावर सुरु असतानाच सोमवार, 6 मे रोजी दुपारी 3.29 वाजेपासून मो.क्रं.8805748190 या क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअपवर नानासाहेब जवरे यांच्याशी संपर्क साधून स्वतःची ओळख मयूर आंबडकर अशी देऊन निळवंडे कालव्याविषयी पाठपुरावा करणारे तुम्हीच का? अशी विचारणा केली. श्रीमान, तुम्हाला दहा लाख रुपये देतो पण उर्वरित काम होता काम नये, असा लोभ दाखवला.

नानासाहेब जवरे यांनी सदरचे काम 182 गावांचे भवितव्य असून कोणत्याही किमतीवर आमची निळवंडे कालवा कृती समिती ही संघटना पाठपुरावा थांबवणार नाही, असे म्हणून नकार दिला. ऐका, मग जिवंत राहून जो जवान देशाची सेवा करू शकतो तो शाहिद होऊन करू शकत नाही. असे म्हणून अप्रत्यक्ष मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नानासाहेब जवरे यांनी काल सायंकाळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा क्रं.277/2019 भा. दं. वि. कलम 507 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी. एस. कोरेकर हे करीत आहेत.

Tags:

1 Comment

  1. देशदूतच्या
    बातम्या वास्तव्यास
    धरुन
    असतात

    Reply

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!