Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

निळवंडेच्या कालव्याचे खोदकाम वेगाने सुरू

Share

अकोले (प्रतिनिधी) – निळवंडे धरणाच्या अकोले तालुक्यातील डाव्या कालव्याचे सात किलोमीटर चे खोदकाम अंशतः पूर्ण झाले आहे तर उजव्या कालव्याच्या खोदकामास ही काल शुक्रवार पासून सुरुवात झाली. काल पासून खोदकाम यंत्रणा वाढविण्यात आली असून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात आहे. शेतकर्‍यांच्या उभ्या पिकातून पोकलेन, जेसीबी च्या साहाय्याने पिके उध्वस्त करीत खोदकाम सुरू आहे.

निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. कालव्याच्या मुखापासून खोदकामास प्रारंभ करण्यात आला असून पहिल्या दिवशी सुमारे अडीच ते तीन किलोमीटर अंतरात अंशत: खोदकाम करण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे बुधवारी तातडीने खोदकामास सुरुवात करण्यात आली. धरणापासून सुमारे पाऊणे तीन किलोमीटरपर्यंत निळवंडेचा एकच कालवा असून पुढे त्याला डावा आणि उजवा असे दोन फाटे फुटणार आहेत. त्यामुळे साहजिकच प्रारंभीच्या पाऊणे तीन किलोमीटरमध्ये कालव्याची रुंदी अधिक आहे.

काल शुक्रवारी उजव्या कालव्याच्या कामाच्या खोदकामासही सुरुवात झाली. उजव्या कालव्याचे सुमारे दीड किलोमीटर खोदकाम करण्यात आले. सध्या रुंभोडीच्या दत्तनगर परिसरात खोदकाम सुरू आहे. पहिल्या दिवशी डाव्या कालव्याचे निंब्रळ परिसरात सुमारे तीन किलोमीटर खोदकाम करण्यात आले.दुसर्‍या दिवशी म्हाळादेवी परिसरात काम झाले. तर काल तिसर्‍या दिवशी मेहेंदुरी परिसरात काम सुरू होते. कालव्याच्या खोदकामास कुणीही विरोध केला नसला तरी खोदकामाच्या ठिकाणी, धरणस्थळावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांबरोबरच राज्य राखीव दलाच्या पोलिस तुकड्याही येथे तैनात करण्यात आलेल्या आहेत.

निळवंडे च्या डाव्या कालव्याचे काल अखेर सात किलोमीटर तर उजव्या कालव्याचे दीड किलोमीटर असे काम झाले आहे.ज्या शेतकर्‍यांच्या पिकातून खोदकाम करण्यात आले आहे,त्यांना नियमा प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.महसूल विभागा मार्फत पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
– भारत शिंगाडे, कार्यकारी अभियंता, निळवंडे कालवे विभाग

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!