निळवंडेतून आवर्तन सुरू

0
अकोले (प्रतिनिधी)-निळवंडे धरणातून शेतीसाठी रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन 1400 क्यूसेक्सने सोमवार पासून सूरू करण्यात आले आहे. हे आवर्तन साधारण 22 ते 25 दिवस सूरू राहिल.
या आवर्तनात साधारण 2500 दलघफू पाणी वापर होण्याची शक्यता आहे अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
मुंबई येथे जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानूसार  दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता निळवंडे धरणातून शेतीसाठी रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन 1400 क्यूसेक्स ने सोडण्यास सुरुवात झाली आहे.

LEAVE A REPLY

*