Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

निळवंडेतून आवर्तन बंद

Share

भंडारदरा (वार्ताहर)- लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा-निळवंडे धरणातून 3 मे रोजी सोडण्यात आलेले आवर्तन काल सकाळी 6 वाजता बंद करण्यात आले.

या आवर्तनापोटी धरणांतील 897 दलघफू पाणी खर्च झाले आहे. आवर्तन सोडतेवेळी भंडारदरा धरणात 1602 तर निळवंडेत 1142 दलघफू पाणीसाठा होता. दरम्यान, श्रीरामपूर तालुक्यात पाणी कमी मिळाल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला होता. तसेच पाणी कमी येत असल्याने गावतळी भरली जात नव्हती. त्यातून असंतोष वाढू लागला होता. याबाबत अधिकार्‍यांना जाबही विचारण्यात आला.

तसेच पाणी मिळावे यासाठी प्रशासन आणि मंत्री पातळीवर प्रयत्न करण्यात आले. काही गावांमध्ये पाण्यावरून तणाव निर्माण झाला होता. पण आता बहुतांश तळी भरण्यात आली आहेत. तर टाकळीभान टेलटँकमध्ये पाणी सोडण्यात येत आहे.

भंडारदरातून पुन्हा पाणी सोडले – दरम्यान, भंडारदरा धरणातून काल दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास 945 क्युसेसने पाणी निळवंडे धरणात सोडण्यात आले आहे. 173 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असून 52 तास हे पाणी सुरू राहणार आहे. यामुळे निळवंडे धरणाची पाण्याची पातळी ही 610 मीटर इतकी होऊन राजुरचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी राजूरकरांवर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले होते. ते दूर झाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!