नाशिकचे युवा क्रीडा मार्गदर्शक निलेश राणे ‘राष्ट्रीय क्रीडा संघटक’ पुरस्काने सन्मानित

0
नाशिक | महाराष्ट्रातील नावाजलेले युवा क्रीडा मार्गदर्शक व नाशिकचे भूमिपत्र निलेश मधुकरराव राणे यांना या वर्षीचा ‘राष्ट्रीय क्रीडा संघटक’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

६ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय एकात्मता साहित्य संम्मेलन व राष्ट्रीय त्यांचा सन्मान झाला.

महाराष्ट्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री भरमू (अण्णा) पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय प्रवचनकार रामानाचार्य विश्वनाथ आणि जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

निलेश राणे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत कुतुहलाने सांगितले की, या पुरस्काराचे खरे मानकरी तर राज्यातील माझे खेळाडू आहेत.

तेच खरे क्रीडा क्षेत्रातील अभिनेते असून आजचा पुरस्कार हा त्यांचा विजय आहे मी तर एक मार्गदर्शक आहे अश्या शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*