इंदोर महानगरपालिकेच्या धर्तीवर नाशिक शहरात रात्रीची सफाई, प्लास्टीक बंदी

0
नाशिक | दि.१३ प्रतिनिधी- इंदोर महानगरपालिकेच्या धर्तीवर नाशिक शहरात रात्री रस्त्यावरील झाडलोट, सफाई कर्मचार्‍यांची बायोमेट्रीक हजेरी, प्लॉस्टिक बंदी अशी कामे तात्काळ करण्याचा महापालिका प्रशासनाचा मनोदय असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बुकाणे यांनी आज पत्रकारांना दिली.

स्वच्छता भारत अभियानात स्वच्छ शहराच्या यादीत वरच्या स्थानावर आलेल्या इंदोर (मध्य प्रदेश) या शहरातील स्वच्छतेसंदर्भातील काही बाबी लक्षात घेऊन त्यानुसार महापालिकेत काही योजना राबविता याव्यात म्हणुन महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बुकाणे व सहा. आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे यांनी इंदोरचा पाहणी दौरा केला. या दौर्‍यात इंदोर महापालिकेच्या केलेल्या पाहणीसंदर्भातील माहिती आज डॉ. बुकाणे यांनी पत्रकारांना दिली.

यात इंदोर शहरात रात्रीच्यावेळी शहरातील रस्ते व बाजारपेठेची झाडलोट केली जाते. इंदोर शहर हे होर्डीग्जमुक्त असुन ही मोठी बाब सर्वात प्रथम लक्ष सर्वाच्या लक्षात येते. शहरातील चौक अथवा रस्त्यांच्या आजुबाजूला कोठेही होर्डीग्जला परवानगी देण्यात आलेली नाही.

त्यामुळे शहराच्या सौदर्यात भर पडत असल्याचे लगेच जाणवते. तसेच शहरात जे काही मोजके होर्डीग्ज दिसतात, ती स्वच्छतेचे आवाहन करणारी महापालिकेची होर्डीग्ज आहे. याठिकाणी रात्रीच्यावेळेस शहराची साफ सफाईचे काम केले जात असुन याकरिता १६ यात्रिकी झाडू देखील कार्यरत आहे.

या शहराची लोकसंख्या २० लाख इतकी असुन महापालिकेत साफ सफाई करिता ५ हजार स्थायी कर्मचारी असुन रोजंदारीवरील सुमारे ४ हजारी काम करीत आहे. याशिवाय कचरा वेचक वेगळे असुन खाजगी एजन्सीमार्फत हे काम केले जाते. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्यास मोठी मदत होत आहे.

तसेच शहरात असलेले डुकरे पकडून ती शहराबाहेर नेण्याचे व ती सांभाळण्याचे काम देखील खाजगी एजन्सीमार्फत केले जाते. याप्रमाणे काम शहरातील मोकाट जनावरांकरिता केले जात आहे. तसेच याठिकाणी श्‍वान निर्बीजीकरणाचे काम खाजगी एजन्सीमार्फत केले जात असुन निर्बीजीकरणानंतर श्‍वान याठिकाणीच सोडले जाते. या शहरात प्लास्टीक बंदी कडेकोट राबविली जात असल्याचे याठिकाणी जाणवले.

तसेच कचरा विलगीकरणाचे काम त्यांनी नुकतेच सुरू केले असुन त्याचे परिणाम देखील याठिकाणी दिसुन येत असल्याचेही डॉ. बुकाणे यांनी सांगितले. या पाहणीनुसार नाशिक शहरात तात्काळ रात्रीच्यावेळी तीन टप्प्यात साफ सफाईचे काम करणे शक्यत असुन याचे नियोजन इंदोरच्या धर्तीवर केले जाणार असल्याचे सांगत डॉ. बुकाणे म्हणाले, सफाई कर्मचार्‍यांची हजेरी बायोमेट्रीक पध्दतीने केली जाईल, कचरा विलगीकरणाचा कार्यक्रमाला वेग देण्यात येणार आहे. तसेच प्लास्टीक बंदी शहरात सुरू करण्यात आली असुन आता तपासणीनंतर तात्काळ दंडाची कारवाई केली जात आहे.

तसेच शहरातील १५०० सफाई कर्मचार्‍यांकडुन प्रत्येक विभागात मोकळी मैदाने, कॉलनी, मख्य रस्ते व परिसरातील पडलेले प्लास्टीक कागद गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याकरिता कर्मचार्‍यांना बारदान व हॅण्डग्लोज देण्यात आले आहे. हे काम चांगल्या पध्दतीने व्हावेत म्हणुन याची जबाबदारी विभागीय स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता निरीक्षक यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचेही त्यांनी सागितले.

LEAVE A REPLY

*