Thursday, April 25, 2024
Homeनगररात्रभर गस्त, तरीही चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ

रात्रभर गस्त, तरीही चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ

एमआयडीसी कार्यक्षेत्रातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर (प्रतिनिधी) – नागापूर एमआयडीसीत मागील काही दिवसांपूर्वी धाडसी चोर्‍या झाल्या. एमआयडीसी पोलिसांकडून नेहमीच गस्त सुरू असतानाही चोर्‍यांचे प्रमाण कमी होत नसल्याने एमआयडीसीतील नागरिक त्रस्त आणि भयभीत झाले आहेत.

- Advertisement -

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण भागातील 31 गावांचा समावेश होतो. तसेच, संपूर्ण एमआयडीसी, नागापूर व नगर-औरंगाबाद, नगर-मनमाड व नगर-कल्याण महामार्गााचा काही भाग येतो. एका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा मोठा परिसराचा समावेश केला गेला आहे. लोकवस्ती जास्त असून, तुलनेत पोलीस कर्मचारी संख्या अगदीच तोकडी आहे.

एक सहायक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक व 65 कर्मचारी असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे संख्याबळ आहे. एमआयडीसी असल्याने बाहेरील आलेल्या नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. तीन महामार्गवर सतत वर्दळ असल्याने अपघाताचे प्रमाण मोठे आहे. शंभर पेक्षा जास्त पोलिसांची आवश्यता असताना व चार ते पाच पोलीस उपनिरीक्षकांची आवश्यकता असताना कमी कर्मचार्‍यांवर काम सुरू आहे.

अशा परिस्थितीत रात्रीच्यावेळी वाढत्या चोरीचे प्रमाण लक्षात घेता पोलिसांकडून दररोज रात्री अकरा ते पाच यावेळेत गस्त घातली जाते. दोन चारचाकी वाहनांचे गस्तीसाठी पथक तयार करण्यात आले आहे. एका पथकाबरोबर चार ते पाच कर्मचारी असतात. दुचाकीवर दोन कर्मचार्‍यांचे पथक गस्तीवर असते.

एक पथक नगर-औरंगाबाद महामार्गावर, एक पथक नगर-मनमाड महामार्गावर तर, एक पथक एमआयडीसी परिसरात गस्त घालत असते. मध्यंतरी नवनागापुरातील एक टायरचे गोदाम फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे टायर लंपास केली. विशेष म्हणेज चोरट्यांनी गोदाम फोडून रात्रभर टायर गोदामातून बाहेर काढून एका शेतात वाहून नेले.

त्यांची ही कृती रात्रभर सुरू होते. तरीही गस्त घालण्यासाठी असलेल्या पथकाला हा प्रकार लक्षात आला नाही. काही स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर पोलीस आले. मध्यंतरी गजानन कॉलनीतील एक बंद घरफोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोने चोरुन नेले. अशा एक ना अनेक घटना दररोज घडत असतात. काही पोलीस ठाण्यात फिर्याद देतात तर काही देत नाही. ज्यांनी दिली त्यांचा चोरीचा तपास लागत नाही.

एमआयडीसीमध्ये मोठ-मोठ्या कंपन्या आहेत. बाहेर गावावरून येथे आलेल्या लोकांची संख्याही मोठी आहे. काही कामानिर्मीत्त बाहेर गेले तर त्यांचे घर असुरक्षित असते. कंपन्या, लोकांची घरे असुरक्षित असतात. परंतु अपुर्‍या कर्मचारीवर पोलीस ठाण्याचा कारभार सुरू आहे. त्यात जे पोलीस कर्मचारी गस्त घालतात त्यांच्या गस्तीबाबत शंका निर्माण होत आहे. अकरा ते पाच गस्त घालतात तर धाडशी चोर्‍या होतात कशा, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या