निघोजमध्ये सत्ताधारी; विरोधक भिडले

0

आठ दिवसांत पुन्हा ग्रामसभा

पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील निघोज येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ग्रामसभेत मागील ग्रामसभेत झालेल्या ठरावांच्या अंमलबजावणीवरून सत्ताधारी; विरोधकांमध्ये राडा झाला.
यामुळे एकच गोंधळ उडाल्याने पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर ग्रामसभा रद्द करण्यात आली. आठ दिवसांत पुन्हा ग्रामसभा घेण्याचे सरपंच ठकाराम लंके यांनी जाहीर केले.
माजी सरपंच संदीप वराळ यांच्या हत्येनंतर 26 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेतील ठरावांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या वराळ समर्थकांनी घोषणाबाजी करीत निषेध केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ, मंगेश लाळगे, रंगनाथ वराळ, मळगंगा पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष बजरंग वराळ, सुनील पवार, माउली वरखडे, निवृत्ती वरखडे, अर्जुन लामखडे यांनी ठरावाच्या अंमलबजावणीविषयी माहिती विचारली होती. यावरून चांगला गदारोळ झाला.
अतिक्रमण धारकांनी पदाधिकार्‍यांना धारेवर धरले. ग्रामपंचायत कारभारावर टीकास्त्र सोडले. यावेळी सरपंच लंके यांनी संयमाने उत्तरे देत ग्रामपंचायतीची बाजू मांडली.
यावेळी ग्रामसभेला महिलांची सख्या कमी होती. पुढील ग्रामसभेला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बचत गटाच्या अध्यक्षा सविता गायखे यांनी केले.

LEAVE A REPLY

*