Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

श्रीनगर येथे निफाड तालुक्यातील जवानाचा अपघाती मृत्यू

Share

नाशिक | प्रतिनिधी 

श्रीनगर येथे निफाड तालुक्यातील दहेगाव भरवस येथील जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे. सागर माधव चौधरी (वय ३२) असे या जवानाचे नाव आहे. तो जम्मू आणि काश्मीर येथील श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावत होता. यादरम्यान  बंदुकीतून गोळी सुटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दिवंगत सागर चौधरी यांच्या मृत्यूची बातमी कालचा सोशल मीडियात फिरत होती मात्र, जिल्हा प्रशासनाने अधिकृत माहिती आज सकाळी मृत्यू अपघाती झाल्याचे सांगितले.

दिवंगत सागर चौधरी हे २३ मार्च २०१२ रोजी सैन्यदलात दाखल झाले होते. देशात विविध ठिकाणी सेवा बजावल्यानंतर गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांची नियुक्ती श्रीनगरमध्ये करण्यात आली होती. त्यांना एक वर्षांचा मुलगा आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार काल (दि. २७) सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास  त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीतून गोळी झाडली गेल्याचे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

विशेष विमानाने त्यांचा मृतदेह मुंबईत दाखल होणार असून त्यानंतर ओझरहून त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!