Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

देशावर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, १६ जणांना अटक

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

देशाविरुद्ध दहशतवादी कारवायांचे कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न राष्ट्रीय शोध विभागाने (National Investigation Agency) उधळून लावला आहे.

एनआयएकडून सैयद बुखारीच्या चेन्नई येथील घरी तसेच कार्यालयात छाप घालण्यात आले. यासोबतच हसन अली युनुसमरिकर आणि हरिश मोहम्मदच्या तामिळनाडूच्या नागापट्टीनम येथील घरी देखील छापा घातला.

हे सर्वजण बंदी असलेल्या संघटनांशी संबध ठेवत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शनिवारी सकाळी एनआयएच्या टीमने तामिळनाडूच्या मदुराई, थेनी, नेलाई सहित अनेक भागांवर छापे टाकत 16 जणांना अटक केली.

अंसारुल्ला नावाच्या दहशतवाद्यावर संघटना चालवून भारताविरुद्ध कटकारस्थान रचण्याचा गुन्हा नोंदविला गेला. 16 जणांना अटक केल्यानंतर एनआयएने याची अधिकृत घोषणा केली.

हे सर्वजण भारतात दहशतवादी हल्ला करण्याच्या प्रयत्नात होते. या हल्ल्यासाठी ते आणखी काही जणांना जोडणार होते. यासोबतच ते हल्ला करण्यासाठी लोकांना स्फोटक, विष, चाकू आणि गाड्यांचे ट्रेनिंग देत असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!