दीपा निसळ प्रतिष्ठान पुरस्कार सोहळा : भारावून टाकणार्‍या संघर्षमय प्रवासाने नगरकर अंतर्मुख  

0
अहमदनगर : जीवनात सर्वत्र अंधार असतांना, सोबत कुणीही नसतांना, समाज निद्रीस्त अवस्थेत असतांना आपल्या ध्येयासाठी प्रवाहाच्या विरोधात जाऊन यश मिळविणार्‍या व भाराऊन टाकणार्‍या तिन रणरागिनींच्या संघर्षमय प्रवास टाकून उपस्थित नगर अंतर्मुख झाले.
दीपा निसळ स्मृती प्रतिष्ठाणच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अपंगावर मात करुन समाजिक, वृत्तपत्र क्षेत्रात आपला ठसा उमटविणार्‍या सांगलीच्या सोनाली नवांगुळ यांना ‘दिपा निसळ पुरस्कार’ सौ. शैला कुलकर्णी यांच्या हस्ते, नगरची सुपूत्री अभिनेत्री किरण खोजे यांना ‘अनिल क्षीरसागर पुरस्कार’ सौ.मालती गौरे यांच्या हस्ते तर पुण्याच्या नदी बचाओसाठी कार्य करणार्‍या ‘आदिती देवधर’ यांना सुधाकर निसळ पुरस्कार अमिता अकोलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी मुलाखतकार स्वरुपा चव्हाण यांनी पुरस्कार विजेत्या तिनही रणरागीनीशी संवाद साधुन त्यांच्या जीवन प्रवास सर्वांसमोर उलगडुन दाखविला.
सोनाली नवागुंळ यांनी आपल्या संघर्षमय प्रवास सांगतांना लहानपणी बैलगाडीतुन अपघात झाल्याने कायमस्वरुपी अपंगत्व आले. मुलगी असल्याने मला जीवनात उभे करण्यासाठीचा आई-वडीलांचा संघर्ष, शालेय जीवनात नाकारणार्‍या अनुभवातुन ङ्ग होम स्कुलफने स्वत:च, स्वत:चा अभ्यास घेत जीवनाला दिशा दिली. रोजच्या जीवनातील अपंगत्वातुन निर्माण झालेल्या संघर्षाचा बाऊ न करता त्यावर मात करण्यात प्रयत्न पुर्वक यश मिळविले. शिक्षणानंतर सामाजिक संस्थेच्या कामातुन आलेल्या ‘संवाद कौशल्याचा’ आत्मविश्वास आणि त्यानंतर ‘स्पर्शज्ञान’कडे झेप असे सांगुन अंपगांना मदतीची सहानुभूती नको आमच्या क्षमता ओळखुन आम्हाला काम द्या व प्रवासात इतरांबरोबर आम्हालाही सहभागी करुन घ्या अशी अपेक्षा व्यक्त केली.
उद्योन्मुख अभिनेत्री किरण खोजे हिने उपस्थितांशी संवाद साधतांना लहान पणापासुन नाटक, अभिनय, एकपात्री, स्नेहसंमेलने या सर्व आवडीच्या गोष्टी व आई-वडीलांचा खंबिर पाठिंबा यामुळे नाट्य-चित्रपट क्षेत्राकडे वळतांना दिल्लीतील  एन.आय.एफ.डी. पर्यंतचा प्रवास संघर्षमय ठरला. दिल्लीतील महान गुरुच्या मार्गदर्शनानंतर मुबईमधील माया नगरी ही अनेक आव्हानांनी भरलेली होती. यावेळी ध्येयाकडे वाटचाल करतांना आलेल्या चढ-उताराता वाचन, लेखन निरिक्षणे व मित्र मैत्रीनी व वरिष्ठांचे मार्गदशृन प्रेरक  ठरले. प्रवाहाच्या विरोधात कार्य करणार्‍या संस्था व व्यक्तीचा संघर्ष हा ‘सर्वायर’ आहे असे भुमिकेतून केलेल्या प्रवास अभिव्यक्तीकडे घेऊन जाणार्‍या ठरल्या. सतत नवीन करण्याचा हा प्रवास प्रत्येक वेळी नवीन अनुभूती देणार्‍या असून दीपा निसळ प्रतिष्ठानचा पुरस्कार यासाठी प्रेरक असल्याने सांगितले.
मुठा नदी बचाओ साठी कार्य कारणार्‍या आदिती देवधर यांनी अवितरपणे चालविलेला संघर्ष त्यांच्याच शब्दात सांगतांना लाखो वर्षापासून वाहनाशी आदिमानवापासून प्रगत मानवापर्यंत सतत साथ देणारी नदी आमच्या नागरी वसाहतीमधून 70% प्रदूषीत झाली आहे. आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी ही नदी शुद्ध रहावी यासाठी हा समाजाचा समाजासाठी असलेला संघर्ष आहे. शहरी भागातील जल युद्ध व त्याबद्दल अज्ञान प्रथम दूर करुन प्रवाहाचे मुख्य श्रोत स्वच्छ करणे, घरात केमिकल विहरीत साधने वापरणे, संकेतस्थलावरुन समाजाला सजग करणे असा हा संघर्ष असुन तो सर्वांना बरोबर घेऊन करण्याचा मानस असल्याचे आदीती यांनी सांगितले.
प्रमुख पाहुण्या मालती गोरे यांनी आपल्या मनोगतात कला मनोरंजन, साहित्य व समाजसेवा यातून अपप्रवृत्तीवर प्रहार करणार्‍या ज्ञानी व्यक्तींनी निष्क्रीय न होता जोमाने हे कार्य सुरु ठेवावे यासाठी हा दीपा निसळ प्रतिष्ठाणचे कार्य प्रेरक असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

*