Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पुढचा महापौर कॅटेगरीचा ?

Share

उद्या मुंबईत सोडत । एससी, ओबीसी महिला आरक्षणाची शक्यता

एसीच्या जागा 9 – राष्ट्रवादी 2, काँग्रेस1, शिवसेना 3,भाजप 2 आणि बसपा 1

ओबीसी महिला 8- राष्ट्रवादी 1, शिवसेना 3, भाजप 3, बसपा 1

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेचा पुढचा महापौर कोण? याचा निर्णय उद्या मुबंईत बुधवारी ड्रॉ काढून होणार आहे. प्राप्त माहितीनुसार नगरचे महापौर पद कॅटेगरीसाठी आरक्षित केले जाणार असल्याचे समजते. नगरल एससी किंवा ओबीसी महिला आरक्षण निघू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. तसे झाले तर महापौर पदासाठीचा घोडेबाजार थांबेल असे सूत्रांचे म्हणणे आहे.

2003 मध्ये नगरला महापालिका स्थापन झाली. स्थापनेनंतर शिवसेनेचे भगवान फुलसौंदर हे पहिले महापौर झाले. त्यानंतर ओपनमधून संदीप कोतकर, संग्राम जगताप यांनी महापौर पद भूषविले. ओपन महिलेच्या आरक्षणात शिवसेनेच्या शीला शिंदे यांना महापौर पदाची संधी मिळाली. त्यानंतर ओबीसी आरक्षणात संग्राम जगताप दुसर्‍यांदा महापौर झाले. संग्राम जगताप आणि अभिषेक कळमकर यांनी अडीच वर्षाची टर्म काढली. महिलेसाठी खुल्या असलेल्या आरक्षणात सुरेखा कदम यांनी महापौर पद भूषविले. आताचे महापौर बाबासाहेब वाकळे हे खुल्या गटातून महापौर झाले.

नगर महापालिकेत आजपर्यंत ओबीसी आणि ओपन (महिला/पुरूष) हीच आरक्षणे पडली आहेत. अजूनपर्यंत एकदाही एससी किंवा ओबीसी महिला आरक्षण पडलेले नाही. उद्या मुंबईत नगरसह राज्यातील महापालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण सोडत होणार आहे. त्यात नगरचे महापौर पद कोणासाठी आरक्षित होणार याकडे नगरकरांच्या नजरा लागून आहेत.

तर बसपाचं नशीब
ओबीसी महिलाचे आरक्षण निघाले तर बसपाचे नशीब फळफळेल असं दिसतंय. शिवसेनेकडे पुष्पा बोरुडे, सुवर्णा जाधव आणि सुनीता कोतकर हे तीन तर राष्ट्रवादीकडे मीनाताई चव्हाण आणि बसपाच्या अश्विनी जाधव या एकमेकव ओबीसी महिला नगरसेविका आहेत. भाजपकडेही तीन नगरसेविक आहेत. मात्र त्या फारशा पॉवरफुल्लं नाहीत. शिवसेनेला पुढच्या अडीच वर्षात सत्तेतून बाजुला ठेवयाची खेळी झाल्यास बसपाच्या जाधव यांचे नशीब उजळेल असे आताचे राजकीय चित्र आहे.

जून 2021 : नवा महापौर
नव्या आरक्षणानुसार जुन 2021 मध्ये नवा महापौर निवडला जाईल, हे महापौर पद कोणासाठी आरक्षित असेल त्याला ही लॉटरी लागेल. नगर महापालिकेत एससीचे 9 नगरसेवक आहेत. ओबीसी महिलांच्या आठ जागा आहेत. प्रत्येक पक्षाकडे तगडा उमेदवार असल्याचे दिसते आहे. त्यामुळेच लॉटरी कोणाला लागणार याची उत्सुकता आहे.

स्पेशल माहिती मागविली
आरक्षणापूर्वी राज्य सरकारने प्रत्येक महानगरपालिकेतून त्यासंबंधीची माहिती मागविली आहे. नगरची माहिती मागविताना आजपर्यंत कोण कोणते आरक्षण निघाले. कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा याची इत्यंभूत माहिती मागविली. महापालिका प्रशासनाने ही माहिती शासनाला कळविली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!