Photo Gallery : ढोलबारेजवळ नाशिक-नंदुरबार शिवशाहीला अपघात; १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी; वाहतूक ठप्प

0
विरगाव (चेतन देवरे) | विरगाव फाट्यावरील शिवशाहीचा अपघात आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या नंदुरबार नाशिक बसच्या अपघाताची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा नाशिक-नंदुरबार शिवशाहीला सटाणा ताहाराबाद रस्त्यावर अपघात झाला. अपघातात १५ ते 20 प्रवासी जखमी झाले असून त्यांना ताहाराबाद व मालेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विंचूर प्रकाशा महामार्ग गुजरातला जोडला जातो त्यामुळे या रस्त्यावर नियमित वाहनांची गर्दी असते.  वीरगाव पासून ३ किमी अंतरावर असलेल्या ढोलबारे गावाजवळ कंटेनर आणि शिवशाहीची समोरासमोर धडक झाली. या घटनेत कंटेनर रस्त्याच्या मधोमध उलटला तर शिवशाही बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

अद्याप घटनेतील जखमींची नावे समजू शकलेली नाहीत. जखमींना रुग्णालयात हलविले जात आहे. अपघात घडल्यानंतर काही क्षणांतच दोन ते तीन किमीपर्यंत दोन्ही बाजूला वाहतुक ठप्प झाली आहे. घटनेची माहिती सटाणा पोलिसांना मिळताच याठिकाणी पोलीस दाखल झाले असून रस्त्यावरून दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

LEAVE A REPLY

*