Blog : भरकटलेली तरूणाई!

0

तरूण म्हटले की आठवते , जोश , जिद्द आणि नवनवीन स्वप्न… मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी स्वप्न पाहिले होते ते म्हणजे तरूणांच्या जीवावर  भारताला महासत्ता बनविण्याचे….

मात्र आजची  तरुणाई वेगळ्याच दिशेने भटकत चालली आहे. सध्याचा युवक प्रेम, व्यसन आणि फॅशनच्या अधिन झाला आहे.

प्रेमात वेडी झालेली तरूणाई!

संवेदना हरवलेली तरूणाई अडीच अक्षरी प्रेमात वेडी झाली आहे आणि एकतर्फी प्रेमातून हल्ला करू लागली आहे. तर दुसरीकडे एखाद्याने जर आंतरजातीय विवाह केला तर त्याचा भरदिवसा शिरच्छेद केला जातो. जात, पात, धर्म यात अडकलेली तरूणाई कसला आणि काय देशाचा विकास करणार? हा खरा प्रश्न आताचा घडीला पडलेला आहे.

ज्या आई-वडिलांनी जन्म दिला लहानाचे मोठे केले, त्याच आई-वडिलांना घराबाहेर काढणारी तरूणाई एक दिवस देशाचे वाटोळे करणार असे दिसते आहे. पण जर हे सगळे होऊ द्यायचे नसेल आणि देशाचं भवितव्य चांगले करायचे असेल तर सर्व तरूणानी एकत्र येण्याची गरज आहे.

व्यसनाच्या आहारी गेलेली तरुण पिढी!

अनेक तरुण व्यसनाधीन झाले आहेत. विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा आणि दारू‌ या सर्व व्यसनामुळे आजचा तरुण शारीरिक व मानसिकदृष्ट्या कमकुवत होत चालला आहे. आईसीआईसीआई लोम्बारड जनरल इन्शुरन्सच्या एका सर्वेक्षणानुसार २३% व्यक्ती तरुण दिसण्यासाठी नशा करतात.

१५% युवा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यासाठी नशा करतात. व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतच आयुष्य उद्ध्वस्त करून घेण्यार्या तरूणाकडे पाहून फार वाईट वाटते. हे थांबायला हवे नाहीतर देशाचं फार मोठा नुकसान होईल.

फॅशनच्या आहारी गेलेले युवक- युवती!

युवकांमध्ये व्यायाम आणि खेळ याची आवड राहिलेली नाही.युवतीमध्ये सौंदर्य आणि लोकप्रिय पाश्चात्य पद्धतीचे कपडे आवड झाली आहे. शेवटी एवढंच सांगेन शरीरावर पैसे खर्च करण्याऐवजी बुद्धीवर पैसे खर्च करा. तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे.

हनुमंत चव्हाण, 8149898265

LEAVE A REPLY

*