पावसाची दडी; कांदा उत्पादक शेतकरी संकटात

0
चांदगाव दि. ०७ वार्ताहर : चांदगाव व परीसरातील शेतकर्‍यांच्या कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या परीसरात पावसाळा सुरु झाला तसा समाधानकारक पाऊस पडलाच नाही. पावसाच्या लहरीपणामुळे धरण कोरडेठाक झाली आहेत.

या परिसरात पाऊस पडला नसल्यामुळे अद्याप विहीरी कोरड्याच आहेत. पिके वाचवण्यासाठी शेतकर्‍याने पर्यायी व्यवस्था म्हणुन बाहेरील गावातुन टंॅकरने पाणी आणावे लागते आहे.

त्यामुळे टंॅकरचे दरही गगनाला भिडले आहेत. 20 हजार लीटर पाण्यासाठी 3 हजार रुपये रक्कम मोजावी लागते. त्यात येणारा वाहतुकीचा खर्च हा वेगळाच येतो.

शेतकर्‍याने पावसाच्या अपेक्षेपोटी तुळतुळ करुण पावसाच्या पाण्यावर कांद्याची रोपे रुजवली खरी परंतु सर्व लागवडी पुर्वीची मशागत पुर्ण होऊनही पाण्याअभावी कांदा लागवड रखडली आहे.

रोपे लागणी योग्य असतानाही रोपाची लागवड न करता पाणी देण्याची वेळ शेतकर्‍यावर आली आहे. पावसाची आस आजही टिकुण आहे. एखादा मोठा पाऊस होईल, हा शिवार पाण्याने भरुण निघेल अशा आशेने शेतकरी वरुनराजाची आतुरतेंने वाट पाहत आहेत.

LEAVE A REPLY

*