Photo Gallery : संत निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे सिन्नरमध्ये आगमन; दातलीत आज दुपारी रिंगण

0

सिन्नर | संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे आज सिन्नरमध्ये आगमन झाले. ठिकठिकाणी सिन्नरकरांनी दिंडीतील वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप केले.

सकाळी दिंडी दाखल होताच सिन्नरकरांच्या आदरातिथ्याने दिंडीतील वारकरी भारावले होते. चहा, खिचडी वारकऱ्यांना वाटप करण्यात आली. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. वारकऱ्यांच्या अभंगवाणीत संपूर्ण सिन्नर शहर भक्तीसागरात बुडाले होते.

विशेष म्हणजे आज त्र्यंबक ते पंढरपूर दिंडीतील पहिले रिंगण सिन्नर तालुक्यातील दातली याठिकाणी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण तयारी करण्यात आली असून वारकऱ्यांसह सिन्नरकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मुसळगाव -खंबाळे रस्त्यावरील दातली चौफुली येथे पालखीचे पहिले रिंगण होईल. कुंदेवाडीकरांचे आदरातिथ्य स्वीकारत व जेवण आटोपून खंबाळे येथे पालखीचा मुक्काम पडतो. मार्गावरील दातली चौफुली येथे पालखी विसाव्याला थांबवण्याची परंपरा आहे. या ठिकाणी दातली ग्रामस्थांकडून पालखीचे पूर्वापार स्वागत करण्यात येते.

सिन्नरमध्ये दिंडी दाखल झाल्यानंतर टिपलेले काही विलक्षण फोटो

LEAVE A REPLY

*