Video : संत निवृत्तीनाथांची पालखी सातपूरमध्ये दाखल

0

नाशिक (देशदूत डिजिटल) ता. २८ : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नाशिकच्या सातपूर येथे आगमन झाले. पिंपळगाव बहुलापासूनच दिंडीचे गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत करायला सुरूवात केली होती.

सातपूर येथे परंपरेप्रमाणे नाशिककरांकडून दिंडीचे स्वागत होणार असून आजचा मुक्काम येथेच असणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी पालखी शहरातील नामदेव विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान ठेवणार आहे.

पालखीचा लाईव्ह व्हिडिओ

निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान; वारकर्‍यांची मांदियाळी

त्र्यंबकेश्वर । संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूर वारीसाठी आज त्र्यंबकेशवरमधून प्रस्थान झाले. यंदा निर्मळ वारी, हरित वारी, प्लास्टिकमुक्त वारी असा अनोखा संकल्प करण्यात आला आहे हे विशेष.

पालखी सोहळ्यासाठी प्रारंभ झाला असून त्र्यंबक तालुक्यातील खेड्यातील अनेक भाविक पालखी दर्शणासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. त्र्यंबक ते तळेगावपर्यँत अनेक भाविक पालखीला मान देण्यासाठी पायी जात असतात.

यावेळी तळेगाव, जातेगाव, वेळूणजे , वाढोली, अंजनेरी, सापगाव, तळेगाव कचुर्ली, हरसूल परिसरातील अनेक भाविक दाखल झाले आहेत.  पंढरीच्या वाटेवरील वारकर्‍यांना निरोप देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधीदेखील उपस्थित आहेत.

पालखी थोड्याच वेळात कुशावर्तावर येईल त्यासाठी भाविकांनी कुशावर्त चौकात मोठी गर्दी केलेली दिसत आहे

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात परिसरातील 40 ते 45 दिंड्यांचे सुमारे 20 ते 25 हजार वारकरी सहभागी होणार असल्याचा अंदाज पंचक्रोशीतून व्यक्त केला जात आहे.

यंदा प्रथमच पालखी सोहळ्याचे नियोजन फक्त संस्थानपुरते मर्यादित न ठेवता पंचवीस वर्षांपासून पालखीसोबत असलेल्या पालखीतील एक प्रतिनिधीला सोबत घेत 25 वारकर्‍यांची समिती संस्थानचे अध्यक्ष संजय धोंडगे यांच्या मार्गदर्शनखाली तयार करण्यात आली आहे. पालखी सोहळ्याचे नियोजन या समितीमार्फत होणार आहे.

पालखी वारी, निर्मळ वारी, हरित वारी, प्लास्टिकमुक्त वारी करण्याचा संकल्प करण्यात आल्याने संपूर्ण पालखीत प्लास्टिक हद्दपार करून वारकर्‍यांना संस्थानतर्फे पत्रावळी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

यंदा तीन अश्व रिंगण

नाशिक, नगर, सोलापूर या तीन जिल्ह्यांतून पालखी जात असल्याने या जिल्ह्यांच्या एका ठराविक जागेवर तीन अश्व रिंगण व्हावेत, अशी इच्छा आहे. त्यामुळे रिंगणासाठी निरीक्षक, पालखीत सहभागी होणारे कीर्तनकार व वारकरी जागा शोधणार आहेत.

फोटो : देवयानी ढोन्नर, देशदूत डिजिटल त्र्यंबकेश्वर

Video : मी चालले पंढरीला…वयोवृद्ध आजीबाईंचा अभंग एकदा बघाच

LEAVE A REPLY

*