नाशिकची मृण्मयी केंगे ‘कॅमल आर्ट कॉन्टेस्ट’ची ‘ग्रॅन्ड फिनाले विनर’

0

नाशिक दि. ०८ प्रतिनिधी  : शाळा सुरु झाली की पुस्तकं पेन्सिलींसोबतच खडूचे रंगही आणले जातात. त्यानंतर पुढचा टप्पा येतो तो पोस्टर कलर्स आणि वॉटर कलर्सचा. असे हे रंग आपल्या शाळेचा अविभाज्य भाग बनतात. काही विद्यार्थी मात्र यात इतके रंगून जातात की, चित्र काढणे आणि रंगवणे ही त्यांची आवड आणि ध्यास होतो आणि अनेक स्पर्धांमध्ये ते यश मिळवतात.

नाशिकच्या मृण्मयी अनुराग केंगे या विद्यार्थिनीनेही असेच यश मिळवून नाशिकचे नाव देश पातळीवर उज्ज्वल केले आहे. कॅमल आर्ट कॉन्टेस्ट 2017-18 च्या ग्रन्ड फिनाले विनर म्हणून मृण्मयी प्रथम आली आहे.

द्वितीय क्रमांक विभागून नैनिताल आणि नवी दिल्ली तर तिसरा क्रमांक विभागून मदूराई, गझियाबाद आणि चेन्नई येथील विद्यार्थ्यांना मिळाला आहे. या स्पर्धेसाठी ११ वी व १२ वी साठीचा हा गट असून याआधी या विद्यार्थ्यांची निवड विभागीय पातळीवर झाली होती.

त्यातही मृण्मयीने दुस-या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. या स्पर्धेसाठी सर्व गट मिळून एकूण ५०,७०,६८० विद्यार्थी होते. त्यामधून प्राथमिक त्यानंतर विभागीय आणि शेवटी ग्रांड फिनालेसाठी एकूण ९७ विद्यार्थी निवडले गेले होते.

या ९७ मधून मृण्मयीने पहिला क्रमांक पटकावला. मृण्मयीने बिझिनेस इन बायोडायव्हरसिटी हा विषय चित्रासाठी निवडला होता. त्यामध्ये तिने पर्यावरण आणि पर्यावरणपूरक व्यवसायाचा परस्पर संबंध मधुबनी शैलीत साकारला आहे. त्यासाठी तिला मानचिन्ह मिळाले आहे.

मृण्मयी ही नाशिकच्या ज्येष्ठ चित्रकार सुहास जोशी यांची विद्यार्थिनी असून त्यांच्यामुळे तिला अनेक भारतीय चित्रशैलींची ओळख झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिला

लहानपणापासून अनेक बक्षीसे मिळाली आहेत. मृण्मयी सध्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि डिझाईन्स कॉलेजमध्ये, डिझाईन्सचे शिक्षण घेत आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

*