तलवारबाजीत महाराष्ट्र मुलांचा संघ उपांत्य फेरीत

0
नाशिक | भारतीय ऑलम्पिक संघटना व अध्यक्ष भारतीय तलवारबाजी महासंघाचे राजीव मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय तलवारबाजी महासंघ व महाराष्ट्र तलवारबाजी संघटना याच्या संयुक्त विद्यमाने ९ व्या मिनी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत १८ राज्यातून ४२५ पेक्षा अधिक खेळाडू कोच नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे सर्व ईलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करून खेळत आहे.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष विजय वाडणे, जनार्धन स्वामी ट्रस्ट, साईबाबा संस्थान विश्वरथचे सचिन तांबे, नगरसेवक राजेंद्र बोनकर, अॅड. जयंत जोशी, धरमशेठ बागरेचा, पिपल बँक संचालक सुनिल कंगले, सुनिल सोनावणे  आदींची उपस्थिती होती.

तलवारबाजी संघाचे खजिनदार अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजीचे अध्यक्ष प्रकाश काटूळे, सचिव डॉ. उदय डोंगरे,  शेषनारायण लोढे, मा. दिलीप घोडके आदींची उपस्थिती होती.

स्पर्धेचा निकाल असा

फॉईल मुली सांघिक – प्रथम – मणिपूर, द्वितीय – पंजाब, तृतीय – महाराष्ट्र , तृतीय- दिल्ली

फॉईल मुले उपांत्य फेरीत मणिपूर, महाराष्ट्र

इपी मुली सांघिक – प्रथम – गुजरात , द्वितीय – मणिपूर , तृतीय – कर्नाटक , तृतीय- हरियाणा

सॅबर मुली सांघिक – प्रथम – दिल्ली , द्वितीय – तामिळनाडू , तृतीय – गुजरात , तृतीय- केरळ.

LEAVE A REPLY

*