Video : जसपालसिंग विर्दी ट्रिब्युट राईड व NRM ची सातवी राईड संपन्न

विविध ठिकाणच्या सायकलीस्टसचा सहभाग

0
नाशिक : गेल्यावर्षी अकाली निधन झालेले नाशिक सायकलीस्टस फौंडेशनचे (एनसीएफ)चे दिवंगत अध्यक्ष जसपाल सिंग विर्दी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी जसपालसिंग विर्दी ट्रिब्युट राईडचे नाशिक सायकलिस्टतर्फे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नाशिकसह विविध ठिकाणच्या एकूण ३०० सायकलीस्टने सहभाग घेत जसपालसिंग विर्दी यांना अभिवादन केले.
आज सकाळी 6 वाजता वाजता गोल्फ क्लब  म्हणजेच हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथून सुरु झालेल्या 20 किमीच्या राईडसाठी सर्व वयोगटातले 300 हुन अधिक सायकलप्रेमी सहभागी होते.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ते वासाळी फाटा ते पुन्हा कान्हेरे मैदान असा या राईडचा मार्ग होता. याचवेळी एनआरएम राईड देखील पार पडली.  यात ४० किमी आणि ८० किमी राईडदेखील पार पडली.  १३६ सायकलीस्ट्सने ८० किमी तर ७६ सायकलीस्ट्सने ४० किमीची राईड मध्ये तर २० किमी राईडमध्ये ६६ सायकलीस्टने सहभाग घेऊन वेळेत राईड पूर्ण केली.

 

सकाळी ६ वाजता सुरू झालेली राईड हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून नाशिक-अंजनेरी-नाशिक  अशी ४० किमीची राईड तर ८० किमीची राईड त्र्यंबकेश्वर महामार्गाने आंबोली फाटा, कश्यपी डॅम, गिरनारे तिथून पुन्हा नाशिक अशी आयोजित करण्यात आली होती.

सायकलप्रेमींचे लाडके असलेल्या जसपाल सिंग विर्दी यांचे मागील वर्षी 8 जुलै रोजी एका सायकल राईड दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने  निधन झाले होते.  नाशिक सायकलीस्ट चळवळीचा महामेरू हरपल्याच्या बातमीने नाशिक हळहळले  होते.
जसपाल सिंग यांनी नाशिकमध्ये सायकल चळवळ रुजवण्यासाठी अनेकप्रकारे प्रयत्न केले. नाशिक शहराला सायकल कॅपिटल बनविण्याचे त्यांचे प्रयत्न होते. नाशिकमधील प्रत्येक सायकलप्रेमी आज जसपालसिंग यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असून कुठल्या ना कुठल्या प्रकारे सामाजिक भान जपत जसपाल सिंग विर्दी यांनी रुजवलेला  समाजकारणाचा वसा आज नाशिकचे सायकलीस्ट घेताना दिसून येत आहेत.
याप्रसंगी जसपाल सिंग विर्दी यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई ते आसनगाव पर्यंत विशेष सायकल राईड मुंबईकर सायकलीस्टने आयोजित केली होती. तसेच भारतीय भूलतज्ञ संघटनेच्या नाशिक शाखेकडून  आणि  वतीने बेसिक लाईफ सपोर्ट कार्यशाळा नाशिकच्या सायकलीस्ट सदस्यांकरिता घेतली.
यावेळी जसपाल सिंग यांचे काका प्रीतपाल सिंग विर्दी, मुलगा हरजस सिंग विर्दी, दातार जेनेटिक्सच्या स्मृती दातार, मिलिंद अग्निहोत्री, एनसीएफचे सचिव नितीन भोसले, राजेंद्र वानखेडे, शैलेश राजहंस, ऍड. वैभव शेटे, योगेश शिंदे, रत्नाकर आहेर, राजेंद्र नाना फड, आदी सदस्य उपस्थित होते.
जस्सी राईड यशस्वी होण्यासाठी एनआरएम हेड नीता नारंग, सोफिया कपाडिया, नितीन कोतकर यांच्या टीमने प्रयत्न केले. जसपालसिंग विर्दी ट्रिब्युट राईडला मिळालेल्या प्रतिसादनंतर नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी आभार मानले.

टँडम सायकलने वेधले लक्ष

टँडम सायकल राईडचा अनोखा अनोखा प्रयोग शहरातील डॉ. मनीषा रौंदळ यांनी मुलगी अपूर्वा सोबत केला. त्यांनी ८० किमी राईड पूर्ण केली. जसपाल सर्व सायकलिस्ट नेहमी वेगळ काही तरी करण्यासाठी प्रेरणा देत असे. त्यांना आदरांजली म्हणुन ही राईड टंडम सायकलवर केली. ते नेहमी म्हणत ‘अपने को साधा वाला सूट नही होता कुछ अलग करेंगे, त्यांच्या   प्रेरणेनेच आज काहीतरी नवीन करत अभिवादन केले असे डॉ. मनीषा रौदळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*