विविध उपयोगी मोबाईल अॅप्स; एकदा बघाच

0

विविध स्टोअर्स वर विविध कॅटॅगिरीजमधील विनामूल्य खुप अँड्राइड अॅप्स उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध ढंगाचे मोबाईल अॅप्स आपला आनंद द्विगुणित करू शकतात. एकदा या मोबाईल अॅप्स विषयी जाणून घेऊयात.

फिटनेस अॅप्स

आरोग्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे परंतु आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमध्ये व्यायाम करणं आणि त्यासाठी ‌जिममध्ये जाणं प्रत्येकाला जमतं. म्हणूनचया टेक्नोसॅव्ही युजर त्यावर व्यायामाची अॅप्स उपाय ठरत आहेत. व्यस्त जीवनशैली मुले अनेकाजण क्लासेसना न जात शास्त्रोक्त पद्धतीने माहिती घेऊन घरच्या घरी व्यायाम करतात त्यांच्यामध्ये ही अॅप्स प्रचंड लोकप्रिय होत आहेत.

आजच्या युवा वर्गाची आवड लक्षात घेऊन विविध कंपन्यांनी
-होम वर्कआउट
-टोटल फिटनेस,
-जिम वर्कआउट,
या नावाची फिटनेस अॅप्स तयार केली आहेत. हे अॅप्स फोरआर्म्स, अॅब्ज, बायसेप्स, कार्डिओ, यांचे किती सेट्स मारायचे, डम्बेल्स किती आणि कसे उचलायचे, प्रत्येक प्रकार किती वेळ करायचा याची परिपूर्ण माहिती फोटोसह देतात. विशेषतः: महिला या अॅप्सला जास्त पसंती देताना दिसून येतात.

योगा अॅप्स

आज सगळीकडे व्यक्तिगत आरोग्याकडे आणि फिटनेसकडे गांभीर्यानं लक्ष देण्याकडे अनेकांचा कल वाढत चालला आहे.
योगाची महती विविध माध्यमांद्वारे सतत कानी पडत आहे त्यामुळे अनेक व्यक्ती आवर्जून योग शिकण्याचा प्रयत्न करताहेत. पण अनेकांना योगाचे क्लासेस लावणे शक्य नसते. त्यामुळे योगाची आवड असणाऱ्यांसाठी योगासन, डेली योगा असे अॅप्स उपलब्ध आहेत या अॅप्सचे वैशिठ्य असे आहे की, भारतातील सर्वच भाषांमध्ये हे उपलब्ध आहे. या लोकप्रिय ठरलेल्या प्रत्येक अॅपमध्ये वर्गवार विभागणी असून प्रत्येक आसन कसे करायचे आणि त्याचे फायदे यांची सविस्तर माहिती कृतीसह दिलेली आहे.

तसेच गूगल फिट व फिटनेस ट्रेनर या मोबाइल अॅप्समध्ये नेहमीच वर्कआऊट प्लॅन आपण सेव्ह करू शकतो. हे अॅप्स अँड्रॉईड तसेच काही जावा फोन्समध्ये प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतो.

डेली योगा

योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘डेली योगा’ या अॅपची मदत होते. या अॅपमध्ये योगाचे महत्त्व आणि त्याचे विविध प्रकार यांची विविध योगासने सचित्र विस्तृत माहिती आहे. तसेच कोणती आसने किती अवधीत करायची आणि कशी करायची याबाबत माहिती आहे. यात 500 हून अधिक आसनांची माहिती, एचडी फॉरमॅटमधील व्हिडिओ उबलब्ध आहे . आणि प्रत्येक व्हिडिओला सुश्राव्य मंद संगीताची जोड दिलेली आहे, हे अॅप ऍन्ड्रॉईड 3.0 आणि त्यापुढील ओएससाठी उपलब्ध आहे.

पॅरेंट योगा

विविध भाषांमधून उपलब्ध असणाऱ्या या अॅपमध्ये योग तज्ज्ञांशी सवांद साधण्याची संधी यात युजर्सना उपलब्ध आहे .
तसेच महिलांना गरोदर काळात आणि त्यानंतर गर्भवती महिलांनी बाळाची तसेच स्वत:ची कशीे काळजी घ्यावी, कोणती योगासने करायची याची विस्तृत माहिती यांत दिली आहे.

नॅचरल फेसलिफ्ट

महिलांसाठी हे ऍप अतिशय उपयुक्त असणारे हे अॅप तब्बल 85 भाषांमधून माहिती देते. या भाषांमध्ये इंग्रजी आणि हिंदी या भाषांचादेखील समावेश आहे. . बहुतेक महिला स्किनकेअर उत्पादनांवर सर्वाधिक खर्च करतात.परंतु त्याऐवजी चेहऱ्याचे काही व्यायाम केल्यास चेहरा आणखी टवटवीत दिसेल.कारण चेहऱ्यावरील सौंदर्य आणखी खुलविण्यासाठी फेशियल योगा महत्वाचा ठरतो हे अॅप तुम्हाला फक्त दहा सोपे व्यायाम सांगितले आहेत. यामुळे चेहऱ्यावरील फॅट्‌स कमी होण्यास मदत होते.

बाबा रामदेव

या अॅपमध्ये सर्व आसने आणि प्राणायाम मुद्रा व्हिडिओसहित उपलब्ध आहेत. तसेच फॅट कमी करण्यासाठी तसेच उच्च रक्तदाब,मधुमेह यासारख्या विशिष्ट रोगासाठी योगासने, प्राणायाम यांचे वेगळे व्हिडिओ यावर उपलब्ध आहेत.

महिलांसाठी अॅप्स

पिरीयड ट्रॅकर अॅप – अनेकदा सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या पिरीयडची तारीख लक्षात ठेवणे महिलांना जिकीरीचे होते. या तारखा लक्षात ठेवणे म्हणजे मोठीच समस्या आहे. पण आता काळजीचे कारण नाही कारण पिरीयड ट्रॅकर अॅप तुमच्या मदतीस हजर आहे. ह्या अॅपच्या सहाय्याने पिरीयड ट्रॅक ठेवता येतो.

मायपिल अॅप – अनवॉन्टेड प्रेग्नन्सी टाळण्यासाठी अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात. मात्र या गोळ्या चुकून एखाद्या दिवशी घ्यायच्या राहिल्या तरी आपण गरोदर तर राहणार नाही ना याची काळजी महिलांना सतावत असते .पण आता महिला निर्धास्त होऊ शकतात कारण ही काळजी दूर करण्यासाठी मायपिल अॅप सज्ज आहे. हे अॅप गोळी केव्हा , कोणत्या वेळी घ्यायची आहे याची आठवण ठेवायला मदत करते.

राईड सेफ – नोकरदार महिला अथवा होममेकर महिला असोत कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना प्रवास करावाच लागतो. तो प्रवास करण्यासाठी कधी सार्वजनिक वाहनांची तर कधी कॅब, टॅक्सी, रिक्षाची मदत घ्यावी लागते. आजकाल या वेळी अवेळी कराव्या लागणाऱ्या प्रवासामुळे महिलांच्या सुरक्षेचा मोठाच प्रश्न निर्माण झालेला आहे . यासाठी राईड सेफ हे अॅप महिला सुरक्षेसाठी उपयुक्त ठरत आहे . कारण या अॅपमुळे कोणत्याही कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही तुमचे लोकेशन, डेस्टीनेशन व अन्य डिटेल्स शेअर करू शकता. एका वेळी कितीही कॉन्टॅक्टस बरोबर ही माहिती शेअर करता येते.

बिग बास्केट अॅप – घरात किचनसाठी लागणारे आणि इतर सामान आठवणीत ठेवून आणणे हे महिलांना कष्टाचे आणि त्रासदायक काम आहे. त्यासाठी याद्या तयार करून पाहिजे ते सामान खरेदी करण्यासाठी विविध दुकानात जावे लागते ,परंतु आता बिग बास्केट अॅप तुम्हाला या सार्याह कष्टातून मुक्ती देत आहे . हे अॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल केपवार घरबसल्या किंवा ऑफिसच्या रिकाम्या वेळात तुम्ही आवश्यक ते सर्व सामान ऑनलाईन नोंदणी करू शकता. हे सामान तुम्हाला तुम्ही सांगितलेल्या वेळात घरपोहोच दिले जाते.

गरोदर महिलांसाठी अॅप्स

प्रेग्नन्सी फिटनेस अॅप : गरोदरपणात. पूर्ण नऊ महिने तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या

दृष्टीनं हे एक अॅप उत्तम आहे. तुमच्या प्रसूतीची तारीख अंदाजे तुम्ही या अॅपवर टाकली, की ते तुम्हाला तुमच्या गरोदरपणातील व्यायामाविषयी सूचना देतं. विशेष म्हणजे दैनंदिन व्यायामातही कुठल्या महिन्यात कुठला व्यायाम प्रकार किती वेळ करायचा, हे ते अॅप सांगतं. तसेच यातच तुम्हाला नोट्सही बनवता येतात.

ग्लो नेचर : हे अॅप गर्भात असलेल्या बाळाच्या आहाराची योग्य काळजी कशी घ्यायची हे सांगतं. या अॅपवर तुम्ही स्वतःचे अनुभवही शेअर करू शकता. शरीरात होणारे बदल, येणारे अनुभव आणि लक्षणंही तुम्ही यावर रेकॉर्ड करू शकता. तसेच अचानक काही कारणानं डॉक्टरांची भेट घेणं आवश्यक आहे का, हेही हे अॅप तुम्हाला सांगतं.

माय प्रेग्नन्सी सेंटर : आईच्या आणि बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीनं उपयोगी असा आहार कोणता त्याच्या मार्गदर्शक सूचना आणि त्याचे व्हिडिओही या अॅपवर आहेत. या अॅपद्वारे इतर आयांचे त्यांच्या गरोदरपणासंबंधीचे अनुभव ऐकता आणि बघता येतात त्यातून तुमच्या गर्भाच्या वाढीच्या दृष्टीनं महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळते. 

बेबी ग्रोथ : हे अॅप स्त्रीरोग तज्ज्ञांनीच तयार केलेलं आहे या अॅपमध्ये तुम्हाला दर आठवड्यातील गर्भाच्या वाढीचा अल्ट्रासाउंड फोटो दिसतो तो बाळाची वाढ सांगतो . तुम्हाला आरोग्याचा सल्ला घेण्यासाठी नेमकं केव्हा स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जायला हवं, हेही हे ’ अॅप सांगतं. या अॅपची लिंक सोशल साइट्सवर शेअर करून तुम्ही बाळाच्या वाढीसंबंधीची माहिती नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणींशीही शेअर करू शकता.

‘क्राय बेबी : हे एक नवं अॅप नुकताच दाखल झालं आहे नव्यानंच आई झालेल्या स्त्रीला बाळ का रडतंय, हे समजण्याकरिता याचा उपयोग होतो ‘क्राय बेबी’ हे. तुमचं बाळ का रडतंय, हे सांगू शकतं. 

लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

LEAVE A REPLY

*