पावसाळ्यातील द्राक्ष पिकाचे व्यवस्थापन करा

0

सूक्ष्म घडाचा विकास (70 ते 120 दिवस)

खरड छाटणी केल्यानंतर आपण सर्वच सूक्ष्म घड निर्मितीचा टप्पा (३० ते ६० )दिवस यामध्ये बागेकडे चांगल्या प्रकारच्या प्रकारे लक्ष देऊन काम करतो. परंतु एकदा पाउस पडल्यानंतर ‘सुटलो’ अशी भावना द्राक्ष बागाईतदारांची असते.

परंतु मागील वर्षी २५  ते ३५ % द्राक्ष बागेमध्ये ऑक्टोबर छाटणी नंतर खूपच कमी माल निघाला होता व ती परिस्थिती पुन्हा आपल्या बागेत येऊ नये हाच  प्रयत्न सर्वच शेतकरी बांधव करीत आहेत.

त्यासाठी सूक्ष्म घडाच्या विकासासाठी ह्या पावसाळी वातावरणात काळजी घायला हवी तसेच पुढील वर्षा मध्ये मिळणारी घडाची लांबी, वजन, साईज व टिकाऊपणा ह्या सर्व घटकांसाठी आज पावसाळी हंगामामध्ये काम करणे गरजेचे आहे, तरी खालील मुद्द्याकडे लक्ष ठेवा.

रोग व किडीचे व्यवस्थापन –

 • ह्या दिवसात गच्च कॅनोपी मुळे व कमी प्रमाणात फवारणी केल्यामुळे रोग व कीड वाढते.
 • ह्या वातावरणात भुरी मोठ्या प्रमाणात वाढत असते, भुरी नियंत्रणासाठी
 • सल्फर – ३०० ग्राम + पोट्याशियम बाय कार्बोनेट- १ किलो

२ ते ३  वेळा उलटापालटा स्प्रे घ्या.

 • बोर्डो ०. ४ % – उल्टा पालटा – २ ते ३ वेळा घ्या.
 • किडीसाठी – थ्रीप्स, मिलीबग नियंत्रणासाठी-
 • दशपर्णी अर्काचा वापर करा
 • प्रमाण – दशपर्णी अर्क २ लिटर +  २०० लिटर पाणी
 • दशपर्णी अर्क १० लिटर ड्रीप ने द्या.
 • खोडकिड व मिलीबग

खोडकिड व मिलीबग असणाऱ्या वेलींचे निरीक्षण करून निशाणी करून ठेवणे व अश्या झाडांना पावसाळ्यात  ड्रेंचींग करावी. पावसाळ्यात पांढऱ्या मुळींची वाढ चांगली होती या काळात –

 • स्लेअर प्रो – ५०० मिली किंवा अॅडमायर- ५०० ग्राम ड्रेंचींग करा.
 • अॅपलोड – २०० मिली + नुवान – २०० मिली घेऊन बुड ओलांडे गच्च धुवा.
 • व्हर्टी – १ लिटर + बिव्हेरिया – १ लिटर +  मेटारायझम -१ लिटर  घेऊन बुड / ओलांडे / पाने यावर गच्च स्प्रे घ्या.
 • ड्रीप ने – व्हर्टी – १ लिटर + बिव्हेरिया – १ लिटर + मेटारायझम – १  लिटर ड्रीप ने द्या.
 • कॅनोपी नियोजन –

या काळामध्ये बगल फुटी जोरात चालतात, शेंडे खूप वाढतात, त्यामुळे डोळ्यावर सावली पडून मृत डोळ्यांचे प्रमाण वाढते, त्यासाठी –

 • बगलफुटी काढा
 • शेंडा मारून घ्या.
 • तळातील २ ते ३ पाने काढून घ्या.
 • काडीची वाढ – ६ / ७ पाने + ८ पाने + ३ पाने = १७ / १८ पाने अशी करा.
 • वारंवार खुडा येणे – त्यामुळे वेलीमधील अन्न्साठ्याचा लॉस होत असतो त्यासाठी वरील प्रमाणे काडीची रचना करा.
 • पाणी नियोजन –
 • पाऊसाने उघडीप दिल्यास ताण पडून पाने पिवळी पडतात. किंवा वाकडी होतात. त्यासाठी पावसाने खंड दिल्यास पाणी ड्रीप ने द्यावा लागेल.
 • पावसाळ्यात अति पावसामुळे बागेत पाणी साचून दलदल होऊ नये यासाठी गल्लीच्या कडेला बांध आला असेल तर तिथे उतार करून घ्यावा. किंवा गल्लीच्या मधोमद खोल नांगरतास टाकावे.
 • अन्नद्रव्यांचा पुरवठा –

सूक्ष्म घड विकासाच्या काळात फॉस्फरस (P), पोट्याश (K), कॅल्शियम(Ca), मॅग्नेशियम (Mg), बोरान(B), झिंक(Zn), फेरस (Fe)  यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. सध्या No3- N नायट्रेट नायट्रोजन चे पानदेठ मध्ये प्रमाण वाढलेले आहे, त्यासाठी फॉस्फरस (P), पोट्याश (K), चा पुरवठा करणे आवश्यक आहे. त्यासाठी –

 • सुपर फॉस्फेट – १ बॅग ची  भिजत घालून सकाळी निवळी ड्रीप ने द्या.
 • SOP – ५० ते ७० किलो माती परीक्षण अहवालानुसार ड्रीप खाली टाका किंवा

SOP – २० किलो + फॉसफरिक असिड – २ लिटर ड्रीप ने द्या.

 • अन्नद्रव्यांचे एकत्रित पुरवठा करण्यासाठी –

           शेंडा टॅपिंग नंतर दर आठवड्याला वरील प्रमाणात १ स्प्रे घ्यावा.

 • वेलीची कार्यक्षमता व प्रतिकार क्षमता सुधारण्यासाठी –
 • ट्रायको + बसिलस + सुडोमोनास प्रत्येकी ३ ते ५ लिटर पर्यंत ड्रीप ने द्या तसेच बागेत १ ते २ फवारणी करा.
 • हिरवळीच्या खतांचा वापर –

ताग, धेंचा, बाजरी, मका, चवळी, मुळा, पेरा किंवा टोचून द्या. तसेच तणनाशकाचा वापर करू नका !तणे वाढवा सर्व हिरवळीच्या खतांसाठी कापून वरंब्यावर टाका. त्यामुळे आच्छादन (cover crop) होईल, जमिनीची पावसाळ्यात धुप होणार नाही.

हिरवळीच्या खताचे फायदे –

१ .सेंद्रिय कर्ब वाढेल.

२. बागेत गांडुळे व इतर उपयोगी सूक्ष्म जीवांची संख्या वाढेल.

३. जमिनी भूसभूषित होऊन पांढऱ्या मुळींची संख्या वाढेल.

४. जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारेल.

५. हिरवळीच्या पिकांमुळे / मिश्र  पिक पद्धती मुळे परभक्षी कीटकांची संख्या वाढून नैसर्गिक रित्या किडींचा बंदोबस्त होण्यास मदत होईल.

 • जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होईल.
 • जमिनीमध्ये वाढलेले क्षार पिण्याचे काम हे क्षार करत असतात.
 • खतांचा वाढलेला असमतोल कमी होईल.

अश्या प्रकारे सर्वत्र सावधान राहून वरील मुद्यांचा अभ्यास करून आपल्या बागेचे व्यवस्थापन केल्यास पुढील सिझन मधील अडचणी दूर होतील.

LEAVE A REPLY

*