Photo Gallery : पूर ओसरू लागला; गोदेकाठी कचऱ्याचा ढीग, मनपाची तत्परता

0
नाशिक | गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग दोन हजार क्युसेसने कमी करण्यात आला आहे. होळकर पुलाखालून देखील पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे गोदेच्या पुरात वाहून आलेला कचरा गोडघाट परिसरात साचला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कचरा उचलण्याचे काम सुरू आहे.

गोदावरीच्या पुरात वाहून आलेल्या पानवेली रामकुंडावरील पुलाला अडकल्या आहेत. तसेच कापलेश्वर मंदिराच्या समोरील भागात पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे चिखल झाला आहे. नाशिक दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी मनपाकडून सकाळी स्वच्छता कार्य हाती घेण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*