खरीप पिकातील ओलावा व्यवस्थापन

0
खरीप पिकांध्ये वारंवार पाऊस पडत असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होतो. त्यामुळे खतांचा प्रतिसादही मिळत नाही आणि जामिनीतील उपलब्ध ओलावा तण खाऊन जााते त्यामुळे धान्य उत्पादनात कमालीची घट येते. यासाठी खरीपामध्ये मशागतीव्दारे अथवा तणनाशकांचा मर्यादित वापर करून तण नियंत्रणात ठेवता येते. बागायती तसेच कोरडवाहू पिकांमध्ये सुध्दा सध्या तणनाशकांच्या शिफारशी उपलब्ध आहेत.

खरीपामध्ये आंतरपिक पध्दतीचा अवलंब जामिनीतील अन्नद्रव्य व ओलावा वापरासंबंधी अत्यंत महत्त्वाचा आहे. वेगवेगळी दोन पिके ज्यांचा कालावधी, मुळाची वाढ, शाकीय वाढ, भिन्नप्रकारची आहे अशी पिके, आंतरपिके म्हणून घेतल्यास, जामिनीतील वेगवेगळया थरातील अन्नद्रव्ये व ओलावा यांचा कार्यक्षम वापर करून, पिक उत्पादनात शाश्वती आणता येते.

यासाठी महाराष्ट्रात तूर + बाजारी (1:2),तूर + मुग/उडीद/चवळी (1:3),तूर + सूर्यफुल (1:2),तूर + सोयाबीन (1:3),कापूस + ज्वारी (1:2), कापूस + मूग/उडीद (1:3) इत्यादी आंतरपिकांची शिफारस करण्यात आली आहे. आंतरपिकांमध्ये कमी कालावधीचे पिक काढल्यानंतर मुख्य पिकात बळीराम नांगराने सरी वरंबा काढल्यास दुहेरी फायदा होतो. त्यामुळे पिकांच्या मुळास मातीची भर मिळते आणि कमी पावसात सरीमध्ये पाणी साठवून उत्कृष्ठपणे
जालसंधारण करता येते व त्याचा धान्य उत्पादन वाढविण्यास हातभार लागतो.

जाास्त पाऊस झाल्यास याच सर्‍यांचा निचर्‍यासाठी उपयोग होऊन पिकामध्ये अतिरिक्त पाणी साठण्याचा धोका टळतो आणि मुळाच्या वाढीस पोषक वातावरण मिळते. खाचरामधील भात पिक पध्दतीमध्ये सुध्दा आता ‘श्री’ पध्दतीमध्ये भाताच्या वाढीच्या अवस्थेत जामीन वापस्यात ठेवली जााते आणि तणांचा बंदोबस्त आणि जालसंधारण आंतरमशागत करून केली जााते आणि फुलोर्‍यानंतर खाचरामध्ये पुन्हा पाणी साठवून भात उत्पादन घेतले जााते.

या पध्दतीमध्ये निविष्ठांची तर बचत करता येतेच, त्याबरोबर पाण्याचाही कार्यक्षम वापर  करून, भाताचे पांरपारिक पध्दतीपेक्षा जाास्त धान्य उत्पादन मिळवता येते. भात काढणीनंतर कडधान्याची अथवा पाण्याची सोय असल्यास पंजााबमध्ये गव्हाची भाताच्या दोन ओळीमध्ये पेरणी केली जााते.

रब्बीसाठी शुन्य मशागतीचा वापर करून मशागतीवरील सर्व खर्चात बचत तर होतेच पंरतू रब्बीची पेरणी वेळेवर केल्यामुळे आणि जामीन उघडी न केल्यामुळे जामिनीतील ओलावा टिकून राहतो व रब्बीमध्ये सुध्दा पावसावरील शेतीत अथवा बागायती शेतीत पांरपारीक शेतीपध्दतीपेक्षा जाास्त उत्पादन मिळवता येते. कोरडवाहू विभागात रब्बी पिकांचे उत्पन्न जामिनीत साठविलेल्या ओलाव्यावरच अवलंबून असते.

महाराष्ट्रातील 18 जि ल्ह्यातील 114 तालुक्याचा अंतर्भाव अवर्षण प्रवण क्षेत्रात केला जातो, या क्षेत्राचा जवळजवळ 80 टक्के भाग हा महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतो. या विभागातील वार्षिक पर्जन्यमान 750 मिमी पेक्षा कमी आहे पंरतू वातावरणातील बाष्पीभवनाचा वेग मात्र वार्षिक पर्जन्यमानाच्या तिप्पट असतो, त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीसाठी लागणार्‍या पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये नेहमीच तूटीच्या अंदाजापत्रकावर अवलंबून रहावे लागते.

कोरडवाहू शेतीत रब्बी हंगामातील पिके जामिनीत साठविलेल्या ओलाव्यावरच येत असतात म्हणून कोरडवाहू शेतीस ओलेल तसे मोलेल असे म्हटले जााते. जामिनीतील ओलावा खालील गोष्टीवर अवलंबून असतो.

अ) जामिनीची खोली
ब) मातीतील चिकणकणांचे प्रमाण
क) सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणि
ड) विम्लयुक्त चोपणपणा

महाराष्ट्राच्या कोरडवाहू क्षेत्रात एकूण क्षेत्राच्या 30 टक्के जामिनी उथळ, 47 टक्के जामिनी मध्यम खोल तर 23 टक्के जामिनी खोल आहेत. रब्बी हंगामात मध्यम ते खोल जामिनीमध्ये ओलावा साठविण्याचे प्रमाण 100 ते 280 मि.मी. पर्यंत असल्याने ज्वारी, करडई, सुर्यफूल, हरभरा या पिकांचे नियोजान करता येते.

मध्यम खोल काळया जामिनीमध्ये चिकणकणांचे प्रमाण 35 ते 65 टक्के इतके असते, त्यामुळे पडणारे पावसाचे पाणी जामिनीत मुरत नाही आणि ओलाव्याची साठवण सुध्दा कमी होते. आशा जामिनीत सुकल्यानंतर रूंद व खोल भेगा पडतात आणि भेगावाटे ओलाव्याचे बाष्पीभवन होते. जामिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा जाास्त असल्यास पाऊस मुरविण्याची क्षमता तसेच जामिनीची जालधारणशक्ती वाढते. त्यासाठी हेक्टरी 5 ते 6 टन शेणखत वापरल्याने पाऊस मुरण्याची क्षमता चौपटीने वाढते.

कोरडवाहू विभागात सखल भागामध्ये खोल काळया जामिनीचा सामू हा 8.5 पेक्षा जाास्त म्हणजे अतिशय विम्लधर्मीय असतो आशा जामिनींना चोपण जामीन म्हणतात, या जामिनीं ध्ये ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जाास्त असते फक्त पृष्ठभागावर कडक पापुद्रा तयार झाल्याने बियाणांची उगवणक्षमता कमी होते. त्यामुळे पेरणीसाठी 20 ते 25 टक्के बियाणांचा वापर जाास्त करावा. तसेच अशा चोपण जामिनीच्या पृष्ठभागावर हेक्टरी 5 टन वाळू + 5 टन मुरूम + 2 टन जिप्सम + 7.5 टन शेणखत एकत्र करून पसरावे म्हणजे बियाणाची
उगवण क्षमता वाढते. आपत्कालीन परिस्थितीत जामिनीतील ओलेलाव्यासाठी उपाययोजना

1. ओलाव्याचा ताण सहन करणार्‍या जाातींची निवड करावी उदा. रबी ज्वारी (उथळ जमिनीसाठी फुले अनुराधा, मध्यम खोल जामिनीसाठी फुले चित्रा आणि मध्यम ते खोल जामिनीसाठी फुले वसुधा), सुर्यफुल (भानु), करडई (भिमा, संरक्षित पाणी असल्यास फुले कुसुम), हरभरा (विजय) इत्यादी.

2. पिकांची वेळेवर पेरणी करून बियाणे व खते दोन चाडयाच्या पाभरीचा वापर करून जामिनीत खोलीवर खत पडेल अशा दृष्टीने खत व बी एकाचवेळी पेरावे.

3. जामिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन पेरणीनंतर 30 दिवसांच्या आत, दोन ओळी आड एक ओळ, अथवा एका आड एक ओळ, अथवा एकाआड एक रोप दुसर्‍या रोपाला इजा न होता काढणे गरजे चे असते.

4. कोळपण्यांची संख्या शिफारशीपेक्षा जाास्त करण्याची गरज पिकांच्या फुलोर्‍यापुर्वी असते त्यामुळे जामिनीचा पृष्ठभाग भुसभूसीत होऊन जामिनीवर मातीचे आच्छादन तयार होते व बाष्पीभवन कमी होऊन जामिनीतील ओलावा टिकविण्यास मदत होते.

उदा. रब्बी ज्वारीची पेरणी केल्यानंतर तीन कोळपण्या देण्याची शिफारस आहे. पहिली कोळपणी ही पेरणीनंतर तिसर्‍या आठवडयात फटीच्या कोळप्याने करावी, त्यानंतर दुसरी कोळपणी पाचव्या आठवडयात अखंड फासाच्या कोळप्याने आणि तिसरी कोळपणी ही दातेरी कोळप्याने आठव्या आठवडयात करावी. आशा कोळप्याने जामिनीवर भुसभूशीत मातीचा थर तयार होतो व तणांचाही बंदोबस्त होऊन जामिनीत ओलावा टिकतो.

5. अवर्षणप्रवण कालावधीत सुर्याच्या उष्णतेने पिकातील अतरंगातून पानांव्दारे मोठया प्रमाणात बाष्पीभवन होत असते, ते कमी करण्यासाठी केओलीन, पाढरा रंग अथवा खडुची पावडर 8 टक्के फवारा पानावर करावा म्हणजे सुर्यप्रकाश पानांवरून परावर्तीत होऊन पानांव्दारे बाहेर पडणारी वाफ कमी करण्यास मदत होते व अवर्षंण ताण सहन
करण्यास मदत होते.

6. आच्छादनाचा (काडीकचरा, तुरकाटया, ज्वारीची धसकटे, वाळलेले गवत इ.) हेक्टरी 5 ते 10 टन प्रमाणे पिकांच्या दोन ओळीत जामिनीवर पसरावे.

7. संरक्षित पाणी देणे, जामिनीलगत नदी, नाले, ओढे, तलाव, शेततळे, विहीर, पाझर तलाव इ. ठिकाणी जिाथे पाण्याची सोय असेल त्याव्दारे पिकास संरक्षित पाणी संवेदनशील अवस्थेत दयावे. उदा. रबी ज्वारी, करडई, सुर्यफुल या पिकांना 30 ते 35 दिवसांनी पहिले पाणी, 50 ते 55 दिवसांनी दुसरे पाणी मिळाल्यास उत्पादनात 50 ते
60 टक्के वाढ होते. एक वेळ पुरतेच पाणी उपलब्ध असल्यास पेरणीपासून 50ते 55 दिवसांनी द्यावे. हरभर्‍याच्या पिकास 35ते 40 दिवसांनी पहिले तर 65 ते 70 दिवसांनी दुसरे संरक्षित पाणी देण्याची शिफारशी करण्यात आलेली आहे.

अशाप्रकारे रब्बी हंगामातील पिकांच्या शाश्वत उत्पादन घेण्यासाठी खरीप हंगामातच पाणी मुरविण्याच्या पध्दतीचा वापर करावा म्हणजे जामिनीतील ओलावा टिकविण्याचे व्यवस्थापन होईल.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.  जिल्हा : अहमदनगर (महाराष्ट्र)

LEAVE A REPLY

*