Video : जळगाव मनपा निवडणूक निकाल : ‘या’ आहेत प्रमुख लढती; लवकरच कल हाती येणार

0

जळगाव : शिवसेना व भाजपसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जळगाव महानगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातील टपाल मतमोजणी होईल त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. लवकरच कल हाती येणार असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मतमोजणीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून याठिकाणी सकाळपासूनच ठिकठिकाणी पोलीस यंत्रणा नजर ठेवून आहेत.

सहा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रकिया पार पडणार आहे. प्रत्येक प्रभागाला 2 असे 38 टेबल ठेवण्यात आले आहेत.

जळगाव महापालिकेसाठी एकूण 55 टक्के मतदान झाले असून आज 19 प्रभागांमधील 75 जागांचा निकाल लागणार आहे. 75 जागांसाठी एकूण 303 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.

प्रभाग 5 अमध्ये   शिवसेनेचे माजी महापौर  विष्णू भंगाळे भाजपचे सुनील माळी व राष्ट्रवादीचे हेमेंद्र महाजन.

प्रभाग 5 बमध्ये  शिवसेनेच्या माजी महापौर राखी सोनावणे, भाजपच्या जहाँ पठाण, राष्ट्रवादीच्या मंगल देवरे.

प्रभाग 5 डमध्ये शिवसेनेचे माजी महापौर नितीन लड्ढा,   भाजपचे अनिल पगारिया

प्रभाग 7 अमध्ये आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी, शिवसेनेच्या साधना श्रीमाळ

प्रभाग 11 अ शिवसेनेचे शामकांत बळीराम सोनवणे, भाजपच्या पार्वता बाई भिल व राष्ट्रवादीच्या सायरा तडवी

प्रभाग 11 कमध्ये माजी महापौर व भाजपच्या उमदेवार सिंधुताई कोल्हे, अपक्षच्या कमल म्हस्के,    अपक्ष नीता सांगोले,   अपक्षच्या अनिता सोनावणे.

प्रभाग 11 ड विद्यमान महापौर व भाजप उमेदवार ललित कोल्हे, शिवसेनेचे बुधा पाटील, कॉंग्रेसचे शिवराम पाटील, अपक्ष किशोर माळी.

प्रभाग 15 अ मध्ये शिवसेनेचे माजी उपमहापौर सुनील महाजन, भाजपचे मेहमूद बागवान, कॉंग्रेसचे जाकीर बागवान.

तर प्रभाग 19 अ मध्ये लता चंद्रकांत सोनावणे व भाजपच्या सारेफा तडवी यांच्या प्रमुख लढती पहावयास मिळणार आहेत.

मतमोजणीसाठी कडक पोलीस बंदोबस्त

LEAVE A REPLY

*