मुले पळविण्याच्या संशयावरून मारहाण; साक्री तालुक्यात पाच जणांचा मृत्यू

0
धुळे | लहान मुलांना पळवण्याच्या संशयावरून साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील ग्रामस्थांनी पाच जणांना जबर मारहाण केली. या घटनेत पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दगडविटांनी ठेचल्यामुळे ओळख पटविणे अवघड झाले आहे.
दरम्यान, मयत पाचही जण सोलापूरकडील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती कळताच आलेल्या पोलिसांवरही येथील ग्रामस्थांनी हल्ला चढवला, त्यात दोन पोलीस जखमी झाल्याची माहिती प्रतिनिधीने दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे हे साक्रीकडे रवाना झाले आहेत. याठिकाणी धुळे पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला असून या गावात  तणावपूर्ण शांतता आहे.

दरम्यान, पाचही मयतांचे मृतदेह पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून यातील कुणाचीही अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*