शेतीविकासात किब्बुत्झच्या विकासाची साक्ष

0

किब्बुत्झ हा हिब्रु भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ एकत्रीकरण असा आपण घेऊ शकतो. किब्बुत्झ म्हणजे सामूहिकरित्या शेती करणे त्याची मालकी सामूहिक असणे. १९०९ पासून किब्बुत झीम चळवळीला प्रारंभ झाला. इस्रायलची पहिली किब्बुत्झ डेगनियाची स्थापना करून, ही अद्वितीय चळवळ नाटकीय रीत्या 100 वर्षांपासूनच्या इतिहासात बदलली आहे.

शेतीला योग्य असे वातावरण नसतानादेखील ज्यू समुदायाने खूपच चिकाटीने आणि मेहनतीने शेतीविषयक बाबींमध्ये विशेष प्रगती केली. पॅलेस्टीनमधील बरीच जमीन स्वतः विकत घेऊन तिथेवसाहती उभ्या केल्या. एकत्रित शेती करून आपण अधिक सुरक्षित राहू शकतो.

त्यांना माहित होते, ज्यू लोकांनी जमिनी विकत घेऊन ज्युईश नॅशनल फंडची स्थापना केली. जोसेफ बाट्झ याने इतर नऊ पुरुष आणि दोन स्त्री मिळून १९०९ मध्ये गावाजवळील गालील समुद्राच्या दक्षिणेच्या टोकाकडे किब्बुत्झची स्थापना केली. देगणी या म्हणजे गहूचे समूह किंवा अन्न धान्याचे समूह असा त्याच अर्थ होतो.

सुरुवातीला १९३० ते १९४० च्या दरम्यान किब्बुत झिम विकास झाला. १२ सदस्यांच्या किब्बुत्झची संख्या १९२२ पॅलेस्टिन मध्ये ७०० पर्यंत पोहचली होती. १९२७ पर्यंत ही संख्या २००० पर्यंत वाढली होती. दुसऱ्या महायुदयाच्या काळात ७९ किब्बुत्झ मध्ये २४१०५ लोक राहत होते.

५% ज्यू ची संख्या पुढे वाढत ६५००० पर्यंत वाढली. १९८९ मध्ये किब्बुत्झची लोकसंख्या १२९००० होती. नंतरच्या काळात ती कमी झाली. एक लाखापर्यंत किब्बुट्झची लोकसंख्या झाली. आता इस्राईल किब्बुट्झची संख्या २५० आहे.१२५००० ज्यू तिथेराहतात.

ही लोकसंख्या इस्राएलच्या लोकसंख्येच्या२ % पेक्षाही कमी आहे. किब्बुट्झ मधील आताचे जीवन फारच बदल आहे. खूपच प्रगती झाली आहे. मूलतः किब्बुत्झ सदस्यांचा खर्च फारच कमी होता आणि आर्थिक विषयातील निर्णय किब्बुट्झ मधील सदस्य वयक्तिक घेऊ शकत नव्हता.

उदाहरणार्थ एकाद्या सदस्याच्या मुलाला विशिष्ट विषयात आवड असेल तर सर्व सदस्यांचेमत घेणे आवश्यक होते. किब्बुट्झ मधील सदस्य आता आर्थिक दृष्ट्या प्रबळ झाले आहेत. १९२० ते१९३० च्या दशकात किब्बुट्झ शेती आणि उद्योगाशी जोडला गेला.

किब्बुट्झ मधील उद्योग खाद्यपदार्थ, प्लास्टिक आणि मेटल यावरच केंद्रितआहे. आज फक्त किब्बुत्झ उत्पन्नात 15 टक्के शेतीचा असतो आणि बहुतेक भौतिक कृतींचे कामपरदेशी कामगारांद्वारे केले जाते.

मूळ कल्पना किबात्त्झ निकमला एक अभेद्य असण्याची शक्यता होती. किब्बुत्झची एक मोठी रक्कम अजूनही उद्योगांकडून येते, परंतु आता किबात्तु झिम व्यावसायिक सेवादेखील चालवत आहेत. जी वाढत्या प्रमाणात फायदेशीर आहेत. किबुत्झ-रन व्यावसायिक पर्यटन विशेषतः यशस्वी झाले आहेत आणि अनेक किबुतुझिम सुंदर अतिथीगृहे आणि हॉटेलांना बढती देतात.

वीरेंद्र सोनवणे, +91 88882 44883

LEAVE A REPLY

*