धुळ्यात मुसळधार; घरात शिरले पाणी
न्युज फोटो 

धुळ्यात मुसळधार; घरात शिरले पाणी

घरांमध्ये साचले कमरे एवढे पाणी

Rajendra Patil

धुळे | Dhule

शहरातील नकाने रोड परिसरात घरांमध्ये पाणी शिरले असून योगेश्वर कॉलनीत कमरे एवढे पाणी साचले आहे.

रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. नकाणे रोड परिसरात तर रस्त्यावर पाट वाहतो आहे. योगेश्वर कॉलनीत कमरे एवढे पाणी साचले असून घरामध्ये पाणी शिरले आहे. या भागात पूर्वी असलेला नाला बुजून नागरिकांनी त्यावर घरे आणि रस्ता तयार केला आहे. पावसामुळे पाण्याला वाट न मिळाल्याने हे पाणी घरामध्ये शिरल्याचे सांगितले जाते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com