Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकारगिल युद्धाबाबत काही खास गोष्टी...

कारगिल युद्धाबाबत काही खास गोष्टी…

कारगिल युद्ध ३ मे १९९९ रोजी सुरू झाले आणि २६ जुलै १९९९ रोजी संपले. यात भारतीय सैन्याने पाकिस्तानला धूळ चारली होती. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ २६ जुलै ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. पण तुम्हाला कारगिल युद्धातबाबत काही गोष्टी माहीत आहेत का.? चला तर जाणून घेऊयात कारगिल युद्धाबाबत काही खास गोष्टी

ज्या ठिकाणी हे युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये लढल्या गेले तो पहिले बल्टिस्थान जिल्हा होता. पहिल्या काश्मीर युद्धानंतर एलओसी पासून वेगळा करण्यात आला होता.

- Advertisement -

कारगिल युद्ध भारत आणि पाकिस्तान मधले १९७१ नंतरचे पहिले युद्ध होते, १९७१ च्या युद्धानंतर बांगलादेशला पाकिस्तान पासून वेगळा देश तयार करण्यात आला होता.

कारगिल युद्ध जेव्हा सुरू होते तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार सत्तेत होते.

भारतीय नियंत्रण रेषेवर होणाऱ्या पाकिस्तानी सैनिक आणि अतिरेक्यांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन विजय’ सुरू केले होते.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शिमला करार असूनही युद्ध झाले होते. या करारात सीमेवर कोणताही सशस्त्र संघर्ष होणार नाही असे नमूद करण्यात आले होते.

भारतीय वायुसेनेचे ‘ऑपरेशन सफद सागर’ हे या युद्धाचा प्रमुख हिस्सा होते. या ऑपरेशन मध्ये पहिल्यांदाच ३२,००० फूट उंचीवर हवाई शक्तीचा उपयोग करण्यात आला होता. या ऑपरेशन साठी विमानाचे पायलट आणि इंजिनिअर्स ना फक्त एका आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या प्रशिक्षणच्या जोरावर चांगले प्रदर्शन केले.

भारतातील नागरिकांनी युद्धात पाकिस्तानशी लढा देणाऱ्या सैनिकांना टीव्ही वर बागितले होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १४ जुलैला या ऑपरेशन विजय पूर्ण झाल्याची घोषणा केली होती, पण अधिकृतपणे २६ जुलै १९९९ ला ऑपरेशन विजय थांबवण्यात आले.

या युद्धात भारताने ५०० हून अधिक जवानांना गमावले, तर पाकिस्तानातील ३००० हून अधिक सैनिक व अतिरेकी यात ठार झाले होते.

भारतीय सैन्याने द्रासमध्ये तयार केलेल्या कारगिल स्मारकात युद्धात शहीद झालेल्या सर्व सैनिकांचे शिलालेख आहेत. तसेच या स्मारकात कारगिलमध्ये भारतीय सैनिकांचे कागदपत्रे, रेकॉर्डिंग आणि चित्रांसह एक संग्रहालय आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या