Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याInternational Literacy Day : पाहा जगातील दहा सर्वात जास्त साक्षर देश !

International Literacy Day : पाहा जगातील दहा सर्वात जास्त साक्षर देश !

आज जागतिक साक्षरता दिन. मानवी समाजाचा विकास होऊन तो अधिकाधिक सुसंस्कृत बनावा. समजात शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांकडून अज्ञानी लोकांची होणारी फसवणूक, पिळवणूक, शोषण आदींपासून त्यांची मुक्तता व्हावी. यासाठी जगभरातील देश प्रयत्नरत आहेत. म्हणूनच युनेस्कोनेही यावर विचार करुन आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्याचे ठरवले. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. जगभरातील जन्मदर कमी करुन लोकसंख्येला आळा घालणे, लैंगिक समानता, व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा उंचवावणे या गोष्टीही साक्षरतेशी निगडीत आहेत. म्हणूनच आजही आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे प्रचंड महत्त्व आहे. शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व जगभरात पटवून देण्यासंदर्भात युनेस्कोमध्ये एकमत झाले. त्यानंतर 7 नोव्हेंबर इ.स. 1965 रोजी युनेस्कोत बहुमताने निर्णय झाला. त्यानंतर 8 सप्टेंबर इ.स.1966 पासून जगभरात जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. म्हणजे 8 सप्टेंबर 1966 हा दिवस पहिल्यांदा जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यात आला. आपण जाणून घेऊयात जगातील दहा सर्वात जास्त साक्षर देश…

उत्तर कोरिया (North Korea)

- Advertisement -

उत्तर कोरियाचा साक्षरतेमध्ये जगात पहिला नंबर आहे. उत्तर कोरियाची लोकसंख्या 25,778,816 इतकी असून तेथील साक्षरतेचे प्रमाण 100 टक्के आहे.

लातविया (Latvia)

लातवियाचा साक्षरतेमध्ये जगात दुसरा नंबर आहे. लातवियाची लोकसंख्या 1,886,198 इतकी असून तेथील साक्षरतेचे प्रमाण 99.90 टक्के आहे.

एस्टोनिया (Estonia)

एस्टोनिया या देशाचा साक्षरतेमध्ये जगात तिसरा नंबर आहे. एस्टोनियाची लोकसंख्या 1,326,535 इतकी असून तेथील साक्षरतेचे प्रमाण 99.80 टक्के आहे.

लिथुआनिया (Lithuania)

लिथुआनिया या देशाचा साक्षरतेमध्ये जगात चौथा नंबर आहे. लिथुआनियाची लोकसंख्या 2,722,289 इतकी असून तेथील साक्षरतेचे प्रमाण 99.80 टक्के आहे.

जॉर्जिया (Georgia)

जॉर्जिया या देशाचा साक्षरतेमध्ये जगात पाचवा नंबर आहे. जॉर्जियाची लोकसंख्या 3,989,167 इतकी असून तेथील साक्षरतेचे प्रमाण 99.80 टक्के आहे.

ताजिकिस्तान (Tajikistan)

ताजिकिस्तान या देशाचा साक्षरतेमध्ये जगात सहावा नंबर आहे. ताजिकिस्तानची लोकसंख्या 9,537,645 इतकी असून तेथील साक्षरतेचे प्रमाण 99.80 टक्के आहे.

अजरबैजान (Azerbaijan)

अजरबैजान या देशाचा साक्षरतेमध्ये जगात सातवा नंबर आहे. अजरबैजानची लोकसंख्या 10,139,177 इतकी असून तेथील साक्षरतेचे प्रमाण 99.80 टक्के आहे.

क्यूबा (Cuba)

क्यूबा या देशाचा साक्षरतेमध्ये जगात आठवा नंबर आहे. क्यूबाची लोकसंख्या 11,326,616 इतकी असून तेथील साक्षरतेचे प्रमाण 99.80 टक्के आहे.

कझाकस्तान (Kazakhstan)

कझाकस्तान या देशाचा साक्षरतेमध्ये जगात नववा नंबर आहे. कझाकस्तानची लोकसंख्या 18,776,707 इतकी असून तेथील साक्षरतेचे प्रमाण 99.80 टक्के आहे.

पोलंड (Poland)

पोलंड या देशाचा साक्षरतेमध्ये जगात दहावा नंबर आहे. पोलंडची लोकसंख्या 37,846,611 इतकी असून तेथील साक्षरतेचे प्रमाण 99.80 टक्के आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या