प्रत्येक गाव आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झाले मुख्य शासकीय ध्वजारोहण
प्रत्येक गाव आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री गुलाबराव पाटील
व्यासपिठावरून बोलतानापालकमंत्री ना.गुलाबराव पाटील

जळगाव - Jalgaon

करोना विषाणूला जिल्ह्यातून हद्दपार करण्याकरीता जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यापासून ते आवश्यकता भासल्यास बाधित रुग्णांना आयसीयू बेड उपलब्ध करुन देण्यापर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गाव आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी राज्य शासनाच्या विविध मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत नागरिकांनीही जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्हावासियांना केले.

भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

ध्वजारोहण
ध्वजारोहणजिल्हाधिकारी कार्यालय

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उप वनसंरक्षक वि. वि. होशिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यंवशी, उपविभागीय अधिकारी दिपमाला चौरे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, राजेंद्र वाघ, प्रसाद मते, किरण सावंत पाटील,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, नायब तहसीलदार रवी मोरे यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, कोरोनायोध्दे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवर
उपस्थित मान्यवर

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा दिवसरात्र राबत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या पाठिशी शासन भक्कमपणे उभे आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असले तरी मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनामुक्त होत आहे. कोरोनामुक्त झालेल्यांपैकी प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी प्लाझ्मा दान करुन कोरोना विषाणूमुळे संकटात सापडलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

तंबाखू मुक्तीची शपथ घेताना
तंबाखू मुक्तीची शपथ घेताना

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आणि कोरोना विषाणूच्या रुग्णांवर औषधोपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, खासगी रुग्णालयांसह इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांसह हजारो कोरोना योध्दे अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांचे कौतूक करुन पालकमंत्री म्हणाले, आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून जिल्हा परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका व नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढत आहे.

स्वातंत्र्य सैनिकांचे स्वागत
स्वातंत्र्य सैनिकांचे स्वागत

शासनाने निश्चित केल्याने जिल्ह्यातील विष्णू भादू खडके, गन्नाथ अखर्डू चौधरी, मुरलीधर इच्छाराम चौधरी, वासुदेव नामदेव महाजन, महादू तंगू वाणी या निवडक स्वातंत्र्य सैनिकांना तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पातोंडे, डॉ.संजय पाटील, डॉ.श्रीमती अश्विनी विसावे, डॉ.राहूल निंबाळकर, श्रीमती मारिया आरोळे, धनराज सपकाळे, अक्षय गोयर, अभिमान प्रल्हाद सुरवाडे, विवेक रमेश सैदाणे, सुरेश सोनवणे या कोरोना योध्दांबरोबरच श्रीमती साखराबाई धनजी मराठे (विरमाता), श्रीमती निर्मला सुवालाल हनुवते (विरपत्नी), श्रीमती इंदुबाई पुंडलिक पाटील (विरमाता), श्रीमती कल्पना विलास पवार (विरपत्नी), श्रीमती सरला बेडीस्कर (विरपत्नी), श्रीमती लक्ष्मीबाई भिवसन पाटील (विरमाता), श्रीमती अनुसयाबाई काशिनाथ शिंदे (विरमाता), श्रीमती तुळसाबाई रोहिदास बागुल (विरमाता), श्रीमती सुनंदा वसंत उबाळे (विरपत्नी), श्रीमती सुरेखा पोपट पाटील (विरपत्नी), श्रीमती कविता राजू साळवे (विरपत्नी), श्रीमती चंद्रकला आनंदा जाधव (विरमाता), श्रीमती कल्पना देवीदास पाटील (विरपत्नी), श्रीमती सुनंदा मनोहर पाटील (विरमाता), श्रीमती रंजना अविनाश पाटील (विरपत्नी), सौ.शैला अनंतराव साळूंखे (विरमाता), रमेश देवराम पवार (विरपिता) या विरमाता, पिता व पत्नी हे कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रक्षेपण फेसबुक लाई्व्ह : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह करण्यात आले. सुरुवातीस जळगाव पोलीस दलाच्या पथकाने पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. तर बॅण्ड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.जी.एम. उस्मानी आणि राजेश यावलकर यांनी केले.

ध्वजारोहण
ध्वजारोहण

या कार्यक्रमापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण 

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक 3 च्या आवारातही सकाळी आठ वा. ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक वि.वि.होंशिग, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजसिंग परदेशी, सहायक मुद्रांक अधिकारी सुनील पाटील, यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com