रिझर्व बॅकेने घटविले रेपो रेट; कर्ज स्वस्त होणार

0

नवी दिल्ली; ता. २ : मुद्रास्फितीचा आढावा घेतल्यानंतर रिझर्व बँकेने आपला रेपो रेट पाव टक्क्यांनी अर्थातच ०.२५ टक्कयांनी घटविला आहे.

सात वर्षातील हा सर्वात कमी रेपो रेट असून तो आता ६.०% इतका झाला आहे. रिव्हर्स रेपो रेटमध्येही घट झाली असून तो आता  ५.७५ टक्के इतका झाला आहे.

रिझर्व बँकेच्या या निर्णयामुळे कर्ज स्वस्त होण्याची चिन्हे आहेत, त्याचसोबत ठेवींवरील व्याजदरही घटू शकते.

एसबीआयने दोनच दिवसांपूर्वी बचत खात्यातील १ कोटीपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदरात कपात केली होती.

LEAVE A REPLY

*