Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedनवापाडा येथे अडीच लाखाचे लाकूड जप्त

नवापाडा येथे अडीच लाखाचे लाकूड जप्त

नवापूर –

तालुक्यातील नवापाडा येथे वनविभागाच्या कारवाईत अवैध ताजा तोडीचे साग, सिसमसह अडीच लाखाचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी एकाविरूध्द गन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी, वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून नवापूर तालुक्यातील नवापाडा येथील संशयित आरोपी याच्या घराची तपासणी केली असता त्याच्या घरात अवैध ताजा तोडीचे साग,सिसम, तयार सोफा, सिसमच्या सेट, टीपॉय, रंधा मशिन,पायउतराई मशिन,सुतार साहित्य आदी वस्तु असा एकुण अंदाजे 2 लाख 50 हजार रुपयाच्या माल आढळुन आला.

सदर माल जप्त करून खाजगी वाहनातुन शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आला. वनपाल कामोद यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक वन संरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल आर.बी.पवार,वनपाल पी.बी.मावची, आर. बी.जगताप, एम.जे.मंडलीक, पी.एस.पाटील यांनी केली.

नवापूर तालुक्यात लाकूड तस्करांविरुद्ध ही सहावी कार्यवाही असून यापुढे पण अशी कार्यवाही सुरु राहणार आहे. स्थानिक व ग्रामस्थांना काही लाकुड तस्करी अथवा अवैध मुद्देमालाबाबत माहिती असल्यास तत्काळ कळवावे.

तसेच मालकी अथवा शेतकर्‍यायाच्या शेतात खैर, साग, सिसम आदी वृक्षाची तोड झाली असल्यास वनविभाग नवापूर,चिंचपाडा,नंदुरबार येथे कळवावे जेणे करुन कायदेशीर कार्यवाही होईल, असे सहायक वनसवरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या