Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : तू चाल पुढं तुला रंं गड्या भीती कशाची…?; विजेच्या धक्क्यात दोन्ही पाय गमावलेल्या भावंडांना दिला धीर

Share

निशिकांत पाटील । प्रतिनिधी

त्याचे वय अवघे 19 वर्षे. एका दुर्घटनेत आजी, आईचा मृत्यू तर बहिणीचे दोन्ही पाय कापावे लागले असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. याच दुर्घटनेत त्याला स्वत:चे दोन्ही पाय गमवावे लागले. दुर्घटनेनंतर उसळलेल्या गर्दीतून मदतीचा ओघ आटला, पाठीवरील सांत्वनाचेे हात आखडले आणि समोर प्रश्न उभा राहिला तो संपूर्ण आयुष्य अपंग म्हणून कसे जगावे याचा. अशा परिस्थितीत या तरुणाला धीर देण्यासाठी, जगण्याची उमेद देऊन ‘लढ म्हणण्यासाठी’ पुढे आले ते महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि अपंग सदस्य.

नवीन नाशिक परिसरामध्ये शिवपुरी चौकात विजेचा धक्का लागून सोजाबाई मारुती केदारे (70) त्यांची सून सिंधुबाई शांताराम केदारे (40) यांचा जागीच मृत्यू झाला, तर नंदिनी केदारे (23) व शुभम केदारे (19) हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी परिसरातील नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी या प्रकरणामध्ये विशेष लक्ष घालून वीज वितरणच्या संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल व्हावे व या कुटुंबाला शासकीय आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले होते.

या दुर्घटनेला दोन महिने उलटून गेले आहेत. या अपघातग्रस्त कुटुंबाची सद्यस्थिती खूपच हलाखीची असून नंदिनी केदारे हिला आपले दोन्ही पाय तर शुभम केदारे याला एक पाय व दुसर्‍या पायाचा पंजा या दुर्घटनेत गमवावा लागला आहे. यामुळे हे दोन्ही भावंड शरीराने अपंग झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर पुढील आयुष्य कसे जगावे, हा प्रश्न निर्माण झाला.

अशावेळी त्यांना धीर देण्यासाठी अपंगांनी पुढाकार घेतला असून महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटनेचे विजय रानाते, कैलास मोरे, कमलेश पाटील, अमोल भालेराव, सचिन परदेशी यांच्यासह ज्यांनी विविध दुर्घटनेत आपले हात-पाय गमावले आहेत असे ज्ञानेश्वर पठारे, महेश पाटोळे, चंद्रशेखर सोनवणे, समाधान हुसळे, तुषार कापडे, शैलेश साळवे, समाधान केदाळे, अविनाश निकुंभ, समाधान हिरे यांनी शुभमची त्याच्या घरी भेट घेऊन आपणही अपंग असताना कसे आनंदी जीवन जगू शकतो याबाबत माहिती देत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या भेटीमुळे शुभममध्येही जगण्याची जिद्द निर्माण होऊन त्याच्या चेहर्‍यावरही आनंद फुलल्याचे यावेळी दिसून आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!