Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedVideo : काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंग रेकॉर्ड करणाऱ्या ओम महाजन यांच्याशी गप्पा...

Video : काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंग रेकॉर्ड करणाऱ्या ओम महाजन यांच्याशी गप्पा…

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकचा युवा सायकलीस्ट ओम महाजन याने नुक्तीचे ३ हजार ६०० किलोमीटरची काश्मीर ते कन्याकुमारी सायकल राईड पूर्ण करत एका नवा रेकॉर्ड नोंदवला. ओम ने आठ दिवस, सात तास आणि ३८ मिनिटात हे अंतर पार केले. श्रीनगर येथील लाल चौकातून आपल्या मोहिमेला त्याने सुरुवात केली होती. चढउताराचे रस्ते, अवघड घाट वातावरणातील वेगवेगळे बदल याचा सामना करत ओमने या विक्रमाला गवसणी घातली.

- Advertisement -

ओमला आता अमेरिकेतील प्रतिष्ठेची रेस अक्रोस अमेरिका (RAM) सायकल राईड पूर्ण करावयाची आहे. तेही सोलो (एकट्याने स्पर्धा पूर्ण करावयाचा प्रकार) या प्रकारात. ओम डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारी २०२१ मध्ये या स्पर्धेसाठीरवाना होणार आहे.

देशदूतच्या अचिव्हर्स आणि न्यूजमेकर सदरात ओम महाजन याच्याशी खास गप्पा झाल्या. यावेळी तो काय म्हणाला बघुयात…

- Advertisment -

ताज्या बातम्या