Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदेशदूत न्यूजमेकर्स : नाशिकच्या 'सॅनसन'ची गरुडझेप

देशदूत न्यूजमेकर्स : नाशिकच्या ‘सॅनसन’ची गरुडझेप

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात अनेक नाविन्यपूर्ण घडामोडी घडत असतात. सध्याच्या लॉकडाऊन काळात सर्वत्र मंदीचे सावट असताना एका कंपनीने मात्र, या मंदीला जोरदार प्रत्युत्तर देत थेट परदेशात सध्याच्या परिस्थितीत उपयुक्त ठरत असलेल्या वस्तूंची निर्मिती करत नावलौकिक प्राप्त केला आहे.

- Advertisement -

भारतीयांची हुशारी पाहून परदेशातूनही या कलाकुसरीची थाप दिली आहे. देशदूत अॅचिव्हर्समध्ये आज नाशिकच्या ‘सॅनसन’ कंपनीचे निशांत राजेंद्र जाधव यांनी पूर्वीची कंपनी गणेश फेब्रीकेशची नंतर ‘सॅनसन’ झाली.

यातून सुरुवातील ओपन जिम तयार करण्यात आली. या कंपनीने नाशिकसह संपूर्ण देशात ठिकठिकाणी ओपन जिम संकल्पना रुजवली. या संकल्पनेला मोठी पसंती मिळाली.

यानंतर फेब्रीकेशनच्या संबंधित सध्याच्या करोनाच्या काळात सनिटायझरचे स्टॅन्ड बनविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. यासाठी त्यांना लंडनमधील एका कंपनीचे कंत्राटदेखील मिळाले

या मशीनला लंडनमध्ये प्रचंड पसंती मिळाली असून आज अनेक ठिकाणी त्याचेच युनिट वापरले जात आहे. ‘सॅनसन’चे नाशिकसह देशभरात चार ठिकाणी युनिट आहेत. यामध्ये दिल्ली, बंगलोर, कोलकाता याठिकाणी सध्या कंपनीचे कामे जोरदार सुरु आहेत.

याठिकाणीच न थांबता जाधव यांच्या पुढाकारातून कंपनीने आता एक बेंच तयार केला आहे. एकाच बेंचवरून जवळपास १४ प्रकारचे व्यायाम करता येऊ शकतात अशी सोय कंपनीने करून दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या