Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedVideo : नाशिकमधील गुन्हेगारीवर लवकरच आळा

Video : नाशिकमधील गुन्हेगारीवर लवकरच आळा

नाशिक शहरात नव्याने विकसित होत असलेल्या उपनगरांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण अधिक दिसत आहे. गुन्हेगारी टोळ्या, सोनसाखळी हिसकावणे व वाहन जाळपोळ यावर शहर पोलीसांनी आपले लक्ष केंद्रीत केले असून लवकरच पोलीस अधिकारी रस्त्यावर दिसतील तसेच गुन्हेगारी मोडीत निघाल्याचा बदल नाशिककरांना पाहावयास मिळेल. नाशिककरांना गुन्हेगारांपासून भिती वाटणार नाही असे वातावरण निर्माण करणे हेच आमचे मुख्य उदिष्ट आहे. असे प्रतिपादन पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी ‘देशदूत’च्या संवाद उपक्रमात केले. देशदूत समुहाचे अध्यक्ष विक्रम सारडा यांनी पांडेय यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्तांनी दिलखूलास गप्पा करत आगामी पोलीसींगबाबत चर्चा केली…

इतर शहरांच्या तुलनेत नाशिकच्या गुन्हेगारीची काय स्थिती आहे, गुन्हेगार, टोळ्या यांना रोखण्यासाठी काय उपायोजना राबवल्या जाणार आहेत?

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर , औरंगाबाद या शहरांच्या तुलनेत नाशिकची गुन्हेगारी खूप कमी आहे. परंतु वाहनांच्या जाळपोळ ही राज्याला नाशिकची देण आहे. तुलनेत सोपा गुन्हा म्हणुन बाहेरील टोळ्या येऊन सोनसाखळ्या हिसकवण्याचे प्रकार करतात. तर शहराच्या अजुबाजुला नव्याने विकसीत होत असलेल्या उपनगरांमध्ये गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. गुन्हेगारी टोळ्या, वाहनांची जाळपोळ व चैन स्नॅचिंग यांवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे.

- Advertisement -

घटना घडताच अवघ्या 10 मिनीटता 13 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संपुर्ण शहराची नाकंबंदी होईल अशा नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे. तर नाकाबंदीची नवी पद्धत अमलात आणली असून हेल्मेट, कागदपत्र अशा तपासण्या न करता सामान्य नागरीकांना त्रास होणार नाही अशा सोप्या पद्धतीची परंतु प्रभावी नाकाबंदी तयार केली आहे. ज्याच्या परिणामी चैन स्नॅचिंगच्या घटना कमी झाल्या आहेत. तर टोळ्यांचे कंबरडे मोडण्याठी याद्या तयार केल्या असून थोड्याच दिवसात वरिष्ठ अधिकारी, पोलीस रस्त्यांवर दिसतील आणि गुन्हेगारी मोडीत निघाल्याचेही नाशिककरांना दिसेल.

करोना काळात ऑनलाईन व्यवहार वाढले, याबरोबरच ऑनलाईन, सायबर फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. ते रोखण्यासाठी काय उपायोजना आपण राबवणार आहेत?

समाजात जसजसे प्रगती होईल, नवे तंत्रज्ञान येईल तशाच प्रकारे गुन्हेगारीमध्येही बदल होत असतो. सायबर गुन्हेगारी हे अभासी दुनयेतील फसवणुक आहे. यामध्ये नागरीकांनीच अमिषाला बळी न पडता थोडी काळजी घेतली तर फसवणुक टाळता येते. या गुन्हेगारीचे आवाहन आम्ही स्विकारले असून स्वतंत्र सायबर सेल, सायबर पोलीस ठाणे यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. ही संघटीत गुन्हेगारी असून दिल्लीतील अनेक अशा गुन्हेगारांना आपण पकडले आहे. या गुन्ह्यांमध्ये तळापर्यंत जाऊन याचे उच्चाटन करण्यावर आमचा भर असेल.

घरगुती हिंसाचार व महिलांच्या सुरक्षिततेच्या कायद्यांमध्ये अपाण काही बदल सुचवू इच्छीता का जेणे महिलांचे अधिक सबलीकरण होईल?

ज्या समाजात महिला किती सुरक्षीत आहेत. त्यावरून त्या समाजातील विकास लक्षात येतो. नाशिकमध्ये रात्री 11 नंतर महिला रस्त्यावर दिसत नाहीत. यामुळे आमची जाबाबदारी अधिक वाढते. महिलांना अधिक सुरक्षीत वाटेल, पोलीस ठाण्यांमध्ये त्यांना आपली काळजी दखल घेतली जाते असे विश्वासाचे नाते तयार करण्यासाठी महिला पोलीसांचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. यासह शहर पोलीसांचे निर्भया पथक सातत्याने कार्यरत असून चांगले काम करत आहेत. भरोसा सेल आहे. आमच्याबरोबरच महिला बालकल्याण विभागाने महिलांच्या तक्रारींकडे लक्ष देऊन एक प्रकारची महिला सक्षमीकरणाची चळवळ कार्यत करण्याची गरज आहे.

शहरात वाहतुक नियम पाळले जात नाही. तसेच शहरातील वाहतुक व्यवस्था गंभीर होताना दिसत आहे याबाबत काय उपायोजना करणार आहोत?

प्रामुख्याने शहराला जोडणार्‍या प्रत्येक मार्गावर अवैध वाहतुक सुरू आहे. जी वाहने सिग्नलवर गर्दी करून वाहतुक कोंडीला कारणीभूत ठरतात. अवैध रिक्षा आहेत. यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र आपण प्रादेशिक परिवहन विभागाला दिले आहे. नागरीक वाहतुक नियम पाळत नाहीत, सिग्नल तोडले जातात. नो एन्ट्रीत प्रवेश करतात याबाबत आमच्या धोरणांत्मक चुका शोधून त्यावर उपायोजना करू, यासह मी वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी आता तुम्हाला रस्त्यावर दिसेल. काही दिवसात वाहतुक कोंडी समाप्त झाल्याचे चित्र आपणास दिसेल.

पोलीस नागरीक यांच्यांत विश्वासाचे नाते निर्माण होण्यासाठी आपण काय उपक्रम हाती घेत आहात?

पोलीस ठाण्यांमध्ये सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष होते व गुंडांना चांगली वागणुक मिळते म्हणुन नागरीकांचा पोलीसांवर विश्वास बसत नाहीत. पोलीसांचे ब्रीद वाक्य सद रक्षणाय, खल निग्रणाय हे आहे. यामुळे आता पोलीस ठाण्यांमध्ये सर्वसामान्यांना चांगली वागणुक मिळेल, त्यांना गुंड, गुन्हेगारांची भिती वाटणार नाही तरच पोलीस व जनतेमध्ये समन्वय साधला जाईल यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत. याचा चांगला परिणाम लवकरच दिसेल, आपण प्रमाणिक प्रयत्न करत राहू

करोनाच्या दुसर्‍या लाटेबाबत चर्चा होत असताना मास्क तसेच नाशिककरांच्या सुरक्षेसाठी कशा पद्धतीने आपण पाहात आहात?

करोना रूग्णांशी माझा जुना सबंध असून अर्थररोड कारागृहात करोनाचा उद्रेक सुरू झाला असताना आपण त्या रूग्णांसमवेत जवळून काम केले आहे निसर्गउपचार पद्धती राबवत त्यांना बरे केले आहे. नाशिकमध्ये पोलीस कोवीड केअर सेंटर सुरू केले. मुळात कोवीड समजून घेतला पाहिजे. आपण सामाजिक अंतर पाळले तर काही होणार नाही. नाहितर मास्क घाला, हातपाय सतत स्वच्छ ठेवा, कारागृह तसेच नाशिक येथेही आम्ही ग्रीन ज्युसवर भर दिला असून एकही पोलीस कर्मचारी करोना पॉझिटिव्ह होणार नाही याकडे आमचे लक्ष आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी ग्रीन ज्युस घेत आहेत.

गुन्हेगार, टोळ्या रडारवर

सायबर गुन्हेगारीच्या मुळापयर्ंत जाणार

नाकाबंदी नवे मॉडेल

वाहतुक कोंडीसाठी धोरणात्मक बदल

सर्वसामन्यांना पोलीस ठाण्यात चांगली वागणुक

महिला असतील अधीक सुरक्षित

वाहतुकीचे नियम तोडणारांसाठी नाशिक फर्स्टच्या सहकार्याने एक अ‍ॅप तयार करण्यात येत आहे. वाहतुकीचा नियम तोडणारास दोन पर्याय दिले जातील, पहिला न्यायालयात जाऊन वाहन सोडवावे, दुसरा पर्याय जागेवर दंडांचा, परंतु दंड भरताना कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक, या क्रमांकावर सबंधीताने दंड भरल्याचा मॅसेज पाठवला जाईल जेणे कुटुंबियांना, नातेवाईकांना कळेल की हा नियम तोडतो. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. याद्वारे कुटुंबाकडून, मुलांकडून त्यांना नियम न तोडण्याचे विनंती होईल याद्वारे नैतिक बंधन येऊन त्यावर वचक बसले.

- Advertisment -

ताज्या बातम्या