Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदेशदूत 'आम्ही' : ‘मानव उत्थान मंच’च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद

देशदूत ‘आम्ही’ : ‘मानव उत्थान मंच’च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद

नाशिक | प्रतिनिधी

देशदूत आयोजित आम्ही सदरमध्ये दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जातो. या आठवड्यात शहरातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘मानव उत्थान मंच’च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला…

- Advertisement -

यावेळी या चर्चेत संस्थेचे संस्थापक जगबीर सिंग व कार्यकर्ते मनीष बाविस्कर यांची उपस्थिती होती. यावेळी देशदूतच्या वतीने हा संवाद रवींद्र केडिया यांनी पूर्ण केला.

या चर्चेत प्रामुख्याने वृक्षारोपण, वृक्ष नुसते लागवड करणे नव्हे तर त्यांची वाढ कशी होईल याबाबतची चर्चा झाली. खासकरून झाडांची बँक ही संकल्पना मांडण्यात आली. याद्वारे नागरिकांना हवे ते देशी झाड संस्थेच्या माध्यमातून विना शुल्क उपलब्ध करून देण्यात येते.

यासोबतच संस्थेने कोव्हीड बाधितांना मदत केली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक परप्रांतीय मिळेल त्या गाडीने, गाडी मिळाली नाही तर पायी उत्तर भारतात मुंबईहून निघाले होते. यादरम्यान अनेक नागरिकांच्या पायात पायतान नव्हते, त्यांना या संस्थेच्या मार्फत मदत करण्यात आली.

शिक्षणातील जाचक अटी दूर करून त्रुटी दूर करण्याच्या साठी संस्थेकडून काही ड्राईव्ह घेण्यात आल्या होत्या. यासोबतच शिक्षकांना प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून देण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या