Type to search

धुळे फिचर्स

धुळ्यात लव्ह जिहादच्या संशयावरुन युवकाला मारहाण

Share

धुळे

शहरातील एका नामांकित आईस्क्रीम पार्लरमध्ये सोबत असलेल्या दोन्ही भिन्न धर्मीय महाविद्यालयीन युवक-युवतींना लव्ह जिहादच्या संशयावरुन काही तरुणांनी हटकले. त्यात या युवकाला सार्वजनिक चोप देण्यात येवून त्याचे दूचाकी वाहन पेटविण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

शहरातील आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गल्ली नं. 5 मधील आईस्क्रीम पार्लवर काही महाविद्यालयीन युवक युवती एकत्र बसले होते. मात्र ते भिन्न धर्मीय असल्याची कुणकूण काही तरुणांना लागली. त्यांनी या युवक-युवतीला हटकले. भेदरलेल्या युवतीने स्वतःबद्दलची व कुटुंबियांविषयीची सर्व माहिती जमावाला सांगितली.

मात्र संबंधित युवकाने उडवा उडवीचे उत्तर दिल्याने त्यास उपस्थितांनी सामुहीक चोप दिला. तेथून लगेचच तो युवक पसार होण्यास यशस्वी झाला. तोपर्यंत ही घटना वार्‍यासारखी शहरभर पसरली. त्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी झाली. यातूनच संतप्त जमावाने त्या युवकाचे दूचाकी वाहन पेटविले.

काही वेळानंतर आझादनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक दिनेश आहेर यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट दिली. दरम्यान महापालिकेच्या अग्नीशाम बंबाने पेटविलेले वाहन विझविले. या घटनेची लव्ह जिहाद म्हणून सर्वदूर चर्चा होत असली तरी यातील सत्यता शोधली जाईल असे, पोलीस निरिक्षक आहेर यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणत्याही तक्रारीची नोंद झालेली नव्हती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!