मनाला मित्र बनविण्यसाठी मनाशी संवाद साधा- प्रा. स्वामिनाथन 

0
नाशिकरोड | कोणत्याही कामात Man, Matter, Machinery, Methodology आणि Money या पाच M ची आवशकता असते. या पाचही गोष्टींचे समन्वय साधण्याचे काम सहावा एम अर्थात मन हे करत असते.
आज विज्ञानाने सिद्ध झाले आहे की, साधारणत: ८५ टक्के आजार  हे Psychosomatic आहेत. ज्या प्रमाणे आपण शारीरिक स्वास्थ्याला महत्व देतो त्याच प्रमाणे आपण मानसिक स्वास्थ्यकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

यासाठी मनाला आपला चांगला मित्र बनवा, मनाशी संवाद साधा आणि मनाला आपला चांगला मित्र बनवा. असे प्रतिपादन जगविख्यात Motivational Speaker Prof. ई. व्ही. स्वामिनाथन यांनी केले.

ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे मंगळवार (दि. ३) रोजी जेलरोड येथील सागर हेरीटेज या सभागृहात मेक माइंड युवर बेस्ट फ्रेंड या विषयान्वये सेमिनार आयोजित करण्यात आला. याप्रसंगी मुख्य वक्ता म्हणून स्वामिनाथन बोलत होते.

जीवनाचे रहस्य उलगडताना प्रो. स्वामिनाथन यांनी सांगितले की, जीवन काय आहे? याचे स्पष्ट लक्ष्य नव्या पिढीला नाही. ते कदाचित जीवनाची एकाधी व्याख्या गुगल वर सर्च करून पटकन सांगून टाकतील.

परंतु जीवनात आनंदी कसे राहावे याचे प्रशिक्षण या पिढीला मिळाले नाही. घरी गेल्यानंतर आपल्या पाल्याला, जीवनाचा अर्थ समजण्यासाठी एक पत्र लिहा, पत्रातून आपल्या भावना त्यांचा पर्यंत पोहोचवा जेणे करून ब्लू व्हेल गेम सारख्या घटना आपल्याकडे होणार नाहीत अशी उपस्थितांना भावनिक साद प्रा. स्वामिनाथन यांनी घातली.

नाशिकरोड मेडिकल प्रॅक्टिसनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. समीर लासुरे यांच्यासह डॉक्टर, इंजिनिअर व नागरिक उपस्थित होते.  ब्रह्माकुमारी शक्ती दिदी व गोदावरी दिदी यांनी आशिर्वचन दिले.

LEAVE A REPLY

*