काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधींची उद्या मुंबईत बैठक

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – काँग्रेस पक्षाच्या राज्यातील नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी (दि.11) सायंकाळी 7.30 वाजता मुंबई येथील प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन या कार्यालयात होणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी दिली.
प्रदेश निवडणूक अधिकारी महेश जोशी यांनी ही बैठक बोलावली आहे. यावेळी प्रदेश पातळीवरील निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यापूर्वी 30 सप्टेंबरपूर्वी तालुका (ब्लॉक) स्तरावरील निवडी पूर्ण झाल्या असून येत्या 19 नोव्हेंबरला अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे.
अनेक जिल्ह्यात पदाधिकारी निवडीचे अधिकारी त्या-त्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना अथवा प्रदेशाध्यक्षांना देण्यात आले आहे. उद्याच्या बैठकीत प्रदेश पातळीवरील निवडीचे अधिकार अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षांना देण्याबाबतचा ठराव संमत होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*