युवकांनी व्यवसायाच्या आधुनिक वाटा धराव्यात : लंघे

0

नेवासा (का. प्रतिनिधी) – दिवसेंदिवस रोजगारीचा प्रश्‍न बिकट होत आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यासाठी ग्रामीण युवकांनी व्यवसायासाठी आधुनिक वाटा धराव्यात असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी केले.

 

नेवासा तालुक्यातील खेडलेकाजळी येथील गावतळ्याच्या आधुनिकीकरण व नवीन तंत्राने मासेपालन प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोकराव ढगे होते. यावेळी दलित वस्ती सुधारणा अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके यांचे हस्ते झाला.

 

 

खेडले काजळी येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बावके यांनी विशेष बाब म्हणून मत्स्यपालनासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याची माहिती प्राचार्य ढगे यांनी दिली. कार्यक्रमास हरिभाऊ ढगे, अंबादास कोरडे, संतोष कोरडे, गणेश ढगे, पोपट मुठे, नामदेवराव उदे, रायभान कोरडे, रामदास ढगे, कृष्णा ढगे, सुदाम कोरडे, कडुबाळ ढगे, मोहन कोरडे, रामदास शेळके, प्रवीण घुले, ग्रामसेवक एस. बी. नेर्लेकर, सोपान कोरडे, बाबासाहेब शिरसाठ व ग्रामस्थ उपस्थित होते. बंडू कोरडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*