नेवासा तालुक्याचा दहावीचा निकाल 89.59 टक्के

0

गेल्यावर्षीच्या तुलनेत 3.59 टक्के घट  5 शाळांचा 100 टक्के निकाल  मुलांचा 86.56 तर मुलींचा 94.59 टक्के निकाल

नेवासा (का. प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा माध्यमिक शालांत परीक्षेचा (दहावी) ऑनलाईन निकाल काल मंगळवारी जाहीर झाला असून यात नेवासा तालुक्याचा निकाल 89.59 टक्के इतका लागला. तो मागील वर्षीच्या तुलनेत 3.59 टक्क्यांनी कमी आहे. बारावीच्या निकालात यंदा वाढ झाली असली तरी दहावीचा निकाल मात्र घटला आहे.
नेवासा तालुक्यातील 69 पैकी 5 शाळांचे निकाल 100 टक्के लागले आहेत. गेल्यावर्षी 11 शाळांचे निकाल 100 टक्के लागले होते. सर्वात कमी 63.63 टक्के निकाल गोपीनाथ मुंडे माध्यमिक स्कूल वांजोळी (पांढरीपूल) या शाळेचा लागला असून गेल्यावर्षीही हीच शाळा सर्वात पिछाडीवर होती.
नेवासा तालुक्यातील 69 शाळांतील एकूण 5905 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. पैकी 5879 परीक्षेस प्रविष्ठ झाले. त्यापैकी 5267 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 89.59 टक्के लागला. गेल्या वर्षीचा निकाल 93.18 टक्के होता. म्हणजे यावर्षी 3.59 टक्के निकालात घट झाली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये 1311 विद्यार्थी विशेष प्राविण्यात (डिस्टींक्शन) उत्तीर्ण झाले. 2065 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली तर 1677 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. 214 विद्यार्थी उत्तीर्ण (तृतीय) श्रेणीत उत्तीर्ण झाले.
100 टक्के निकाल लागलेल्या शाळा- मुळा पब्लिक स्कूल (सोनई), न्यू इंग्लिश स्कूल (वाकडी), त्रिमूर्ती पब्लिक स्कूल (नेवासा फाटा), सेंट मेरीज हायस्कूल (नेवासा फाटा), ज्ञानमाउली इंग्लिश मीडियम स्कूल (घोडेगाव).
95 टक्क्यांहून अधिक निकाल लागलेल्या शाळा – कै. घाडगे पाटील माध्यमिक विद्यालय तेलकुडगाव (99.14), गुरुदास भास्करगिरी विद्यालय जळके खुर्द (99.07), जिजामाता पब्लिक स्कूल भेंडे (98), सौ. सुंदरबाई गांधी कन्या विद्यालय नेवासा (97.95), डीएच घाडगे पाटील विद्यालय नेवासा फाटा (97.61), पाथरवाला माध्यमिक विद्यालय (97.56), हनुमान विद्यालय बेलपिंपळगाव (97.00), आनंद माध्यमिक विद्यालय गणेशवाडी (96.55), राजे संभाजी माध्यमिक विद्यालय कौठा (95.65), सद्गुरू नरेंद्र महाराज विद्यालय जेऊर (95.34).
70 टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागलेल्या शाळा – गोपीनाथ मुंडे माध्यमिक विद्यालय वांजोळी (63.63), रुरल हायस्कूल वडाळा बहिरोबा (65.95), न्यू इंग्लिश स्कूल सुरेगाव (70).
मुलीच पुढे – नेवासा तालुक्यातील एकूण 3673 मुले व 2232 मुली असे एकूण 5905 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले हाते. त्यापैकी 3662 मुले व 2217 मुलींनी परीक्षा दिली. त्यातील 3170 मुले व 2097 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 86.56 टक्के तर मुलींचे प्रमाण 94.59 टक्के इतके आहे.

नेवासा तालुक्यातील सर्व 69 शाळांचा निकाल

शाळानिहाय निकाल टक्केवारी

शाळा गाव निकाल

1 ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा 87.27
2 शनैश्‍वर विद्यालय, सोनई 82.06
3 कुकाणे इंग्लिश स्कूल कुकाणा 95.89
4 रुरल हायस्कूल वडाळा 65.95
5 जवाहर माध्यमिक विद्या. चांदा 88.10
6 छत्रपती शिवाजी विद्याल. करजगाव 92.80
7 घोडेश्‍वरी माध्यमिक घोडेगाव 88.13
8 सौ. बदामबाई गांधी नेवासा 80.00
9 पाचेगाव इंग्लिश स्कूल पाचेगाव 85.32
10 न्यू इंग्लिश स्कूल सलाबतपूूर 93.33
11 श्रीराम हायस्कूल भानसहिवरे 86.25
12 सिद्धेश्‍वर इंग्लिश स्कूल प्रवरासंगम 87.59
13 न्यू इंग्लिश स्कूल गेवराई 88.67
14 हनुमान विद्यालय बेलपिंपळ 97.00
15 सद्गुरु किसनगिरी विद्या. उस्थळ दु. 85.84
16 ज्ञानेश्‍वर विद्यालय खरवंडी 92.85
17 न्यू इंग्लिश स्कूल वरखेड 79.41
18 जिजामाता भेंडा 89.03
19 मुळा पब्लिक स्कूल सोनई 100
20 अ. होळकर माध्यमिक देडगाव 87.75
21 न्यू इंग्लिश स्कूल माका 86.66
22 गुरुदास भास्करगिरी वि. जळके 99.07
23 न्यू इंग्लिश स्कूल सुरेगाव 70.00
24 न्यू इंग्लिश स्कूल शिरेगाव 92.15
25 न्यू इंग्लिश स्कूल तामसवाडी 86.88
26 न्यू इंग्लिश स्कूल लोहगाव 87.50
27 श्रीमती ताईसाहेब कदम सोनई 92.59
28 न्यू इंग्लिश स्कूल कांगोणी 81.57
29 म. जो. फुले माध्यमिक माळीचिंचोरा 87.09
30 सौ. गांधी कन्या वि. नेवासा 97.95
31 आदर्श विद्यालय नेवासा 70.37
32 आदर्श विद्यामंदिर सोनई 88.23
33 न्यू इंग्लिश स्कूल मुळाफॅक्टरी 87.28
34 श्रीराम मा. विद्यालय देवगाव 85.50
35 तुकाई विद्यामंदिर शिंगवेतुकाई 88.09
36 विश्‍वेश्‍वर नाथबाबा नेवासा बु. 90.47
37 न्यू इंग्लिश स्कूल खुपटी 95.74
38 कै. घाडगे पाटील माध्य. तेलकुडगाव 99.14
39 न्यू इंग्लिश स्कूल वाकडी 100
40 जय श्रीराम विद्यामंदिर मुकिंदपूर 76.47
41 राजे संभाजी माध्यमिक कौठा 95.65
42 भगवानबाबा माध्यमिक महालक्ष्मीहि. 81.08
43 श्री. डीएच घाडगे पाटील नेवासा फाटा 97.61
44 त्रिमूर्ती पब्लिक स्कूल नेवासा फाटा 100
45 स. मुकुंदराव पाटील तरवडी 91.89
46 शनैश्‍वर माध्यमिक शिंगणापूर 80.55
47 न्यू इंग्लिश स्कूल म्हापिंपळगाव 91.89
48 गो. मुंडे माध्यमिक विद्या. पांढरीपूल 63.63
49 अल अमीन उर्दू विद्या. नेवासा 97.05
50 गुरुदत्त माध्यमिक देवगड 79.16
51 वकीलराव लंघे पाटील शिरसगाव 92.50
52 न्यू इंग्लिश स्कूल निंभारी 85.29
53 सुदामराव मते पाटील गोगलगाव 93.61
54 वै. बन्सी महाराज तांबे रांजणगाव 90.00
55 स्वामी विवेकानंद मो. चिंचोरे 83.87
56 आनंद माध्यमिक गणेशवाडी 96.55
57 सेंट मेरीज हायस्कूल नेवासाफाटा 100
58 अंबाडे माध्य. विद्यालय रस्तापूर 75.00
59 पाथरवाला माध्यमिक पाथरवाला 97.56
60 हनुमान विद्यालय गोंडेगाव 74.41
61 न्यू इंग्लिश स्कूल बर्‍हाणपूर 73.33
62 न्यू इंग्लिश स्कूल गळनिंब 79.31
63 सद्गुरु नरेंद्र महाराज वि. जेऊर 95.34
64 न्यू इंग्लिश स्कूल साईनाथनगर 91.66
65 सुदर्शन इंग्लिश स्कूल पिचडगाव 82.85
66 शहाली बाबा माध्यमिक पिं. शहाली 82.97
67 त्रिमूर्ती सेकंडरी विद्यालय घोगरगाव 94.44
68 जिजामाता पब्लिक स्कूल भेंडे बु. 98.00
69 ज्ञानमाउली इंग्लिश मीडि. घोडेगाव 100

LEAVE A REPLY

*