Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नेवासा तालुक्यात फवारणी अन् पाऊस पडला शेवगाव तालुक्यात

Share

सुखदेव फुलारी

भेंडा – नेवासा तालुक्यात काल कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात आला. रसायनाची फवारणी नेवासा तालुक्यात मात्र फवारणीनंतर दाटून आलेले ढग शेवगाव तालुक्यात रिकामे झाले. शनिवारी दुपारी 4 चे सुमारास भेंडा परिसरात आकाशात कृत्रिम पावसायोग्य ढग दिसून आले. 4 वाजून 10 मिनिटांनी अचानक दोन विमाने भानसहिवरे, भेंडा-कुकाणा परिसरात घिरट्या घालताना दिसून आली. या विमानांनी ढगांमध्ये दोन फेर्‍या मारून रसायनाची फवारणी केली. रसायन फवारणी केल्याचे अनेकांनी स्वतः बघितले आणि इतरांनीही फोन केल्याने भेंडा परिसरातील नागरिक घराबाहेर, रस्त्यावर येऊन कृत्रिम पावसासाठी फवारणी करणार्‍या विमानांना बघण्याचा आनंद घेत होती.

औरंगाबाद येथील विमानतळा वरून आलेल्या विमानांनी नेवासा तालुक्यात प्रथमच कृत्रिम पावसाचा प्रयोग केला. आकाशात जमा झालेल्या ढगांवर विमानातून दोन फेर्‍यात रसायनाची फवारणी करण्यात आली असल्याचे दिसून आले. रसायनाच्या फवारणीनंतर दाटून आलेले ढग वार्‍याच्या वेगाने भेंडा-कुकाणा गावापासून पूर्व बाजूला सरकले. यामुळे नेवासा तालुक्यातील भेंडा, तरवडी या गावांमध्ये हलक्या सरी पडल्या. मात्र पुढे सरकलेले ढग शेवगाव तालुक्यातील काही गावांमध्ये रिकामे झाले.शेवगाव तालुक्यातील देवटाकळी परिसरात दमदार तर खुंटेफळ, ताजनापूर, बोडखे गावाचे परिसरात जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

शासकीय यंत्रणेला माहिती नाही…
दरम्यान नेवासा तालुक्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग होत असल्याची किंवा फवारणी होत असल्याची माहिती आपणास आहे काय? अशी विचारणा नेवाशाचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना केली असता आमच्या कार्यालयाला अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे सांगण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!