नेवाशाचा उपनगराध्यक्ष आज ठरणार

0

नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा

नेवासा (का. प्रतिनिधी) – येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीसाठी आज उपविभागीय अधिकार्‍यांनी आज सोमवार दि. 19 रोजी दुपारी 2 वाजता उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर बोलावलेल्या विशेष सभेत नगराध्यक्षांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार असून उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

नेवाशाचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने व या प्रवर्गाच्या भारतीय जनता पक्षाच्या एकमेव नगरसेविका निवडून आलेल्या असल्याने नगराध्यक्षपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला व त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा आज होईल. कामकाज सुरु होताच नगरध्यक्षांच्या नावाची घोषणा होईल. उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यास पिठासीन अधिकारी वेळ देतील. त्यानंतर माघारीसाठी वेळ देवून गरज भासल्यास निवडूक मतदान प्रक्रिया पार पडेल.

क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या नगरसेवकांची संख्या 9 असल्याने त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. या पक्षाकडून उपनगराध्यक्ष पदासाठी जुने अनुभवी नंदकुमार पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपाकडून शालिनी सुखदान यांच्या नावाची चर्चा असली तरी भाजपाकडे संख्याबळाअभावी उपनगराध्यक्षही बिनविरोध निवडून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*