Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या

Share

नगरसेविकेला विशेष सभेची नोटीस न दिल्याचा विचारला जाब

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नगरपंचायत कारभारातील क्रांतिकारी व भाजप नगरसेवकांची अंतर्गत धुसफूस जास्त वाढत चालल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. 15 दिवसांपूर्वी सत्ताधारी भाजप नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांच्या विरोधात उपोषण केल्यानंतर काल सोमवारी पुन्हा क्रांतिकारीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या कारभाराविरोधात नगरपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन चालू केले.

महिनाभरापासून नगर पंचायत आरोप-प्रत्यारोपाने गाजत आहे. नगरपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराच्या निषेधार्थ व रखडलेल्या विकास कामांना गती मिळावी यासाठी क्रांतिकारीच्या नगरसेवकांनी उपोषण केले होते. त्यानंतर आठ दिवसा पूर्वीच बाजारतळावर होणार्‍या व्यापारी संकुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात क्रांतिकारीला मुद्दाम डावलण्यात आल्याने भाजपच्या आधीच क्रांतिकारीने नागरीकांच्या हस्ते संकुलाचे भूमिपूजन उरकून घेत भाजपवर कुरघोडी केली होती. त्यानंतर 19 रोजी झालेल्या नगरसेवकांच्या विशेष सभेचा अजेंड नगरसेविका फिरोजबी इमामखान पठाण यांना देण्यात आला नव्हता. यासंदर्भात पठाण यांनी मुख्याधिकार्‍यांकडे विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने ठिय्या आंदोलन करण्यात आले. पठाण यांचे नगरसेवकपद अपात्र ठरवण्यात आल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने त्याला स्थगिती देत नगरपंचायत कारभार पाहण्यास परवानगी दिली होती. दि. 25 रोजी उपजिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत होणार्‍या विशेष निवड समितीच्या सभेची नोटीस पठाण यांना देता येते तर नगरपंचायतच्या सभेला का डावलले? याचा जाब आज क्रांतिकारकच्या नगरसेवकांनी विचारला.

तसेच सर्वानुमते करण्यात आलेल्या ठरावात नंतर बदल केला जातो, ठरावाची प्रत मागितली असताना दिली जात नाही. कोणत्याही कामात मुद्दाम डावलले जाते. असे आरोप करत क्रांतिकारीने ठिय्या आंदोलन केले. त्यामध्य्े उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, लक्ष्मण जगताप, फारूक आतार, संदीप बेहळे, अ‍ॅड. काका गायके, सचिन वढागळे तसेच अंबादास इरले, अल्ताफ पठाण, सतीश पिपंळे पी. आर. जाधव, महेश मापारी, जितेंद्र कुर्‍हे सहभागी झाले.

नगरसेविका फिरोजबी पठाण यांनी दिलेल्या लेखी तक्रारी संदर्भात सभा विभागप्रमुख व कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागविला आहे. त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल.
-समीर शेख, मुख्याधिकारी नेवासा नगरपंचायत

नगर पंचायतीच्या कारभारात नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांनी सर्वांना समान न्याय देणे अपक्षित असताना हे दोघे मात्र मनमानी करून क्रांतिकारीच्या नगरसेवकांना अडचणीत आणत आहेत.
– नंदकुमार पाटील,  उपनगराध्यक्ष

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!